४-१२-१९५४ कोणत्याही निष्णात पंडिताने बौद्ध धमाच्या तत्त्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी मी त्याचा पराभव केल्यावाचून राहणार नाही - Page 453

कोणत्याही निष्णात. . . . . केल्यावाचून राहाणार नाही ४१३

गौतम बुद्धांना मुळीच पसंत नाहीत. ज्या देशात या धर्माचे नावही नाही अशा देशात धर्म प्रचाराच्या संस्था निर्माण करून त्यांच्यामार्फत भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचे बी पेरावे. हे आपले सिलोनी बंधु असे का करीत नाहीत, त्याचे मला मोठे नवल वाटते. तसेच या ब्रह्मदेशातील लोकही धार्मिक उत्सवाप्रित्यर्थ हजारो रुपये खर्च करतात. ते त्यांनी मी वर सांगितल्याप्रमाणे खर्च केले तर अल्पावधीत आपणाला बौद्ध धर्माचा प्रसार करता येईल.

भारत देशाविषयी बोलावयाचे झालेच तर मला मोठ्या दु:खाने म्हणावे लागते की, ज्या देशात गौतम बुद्धाचा जन्म झाला त्याच देशात त्याच्या धर्माचा लोप व्हावा अशी विचित्र घटना का घडावी ? तुमच्यापैकी फारच थोड्या राष्ट्रांना याची कल्पना असेल की, हिंदुस्थानात ब्राह्मणांनी आपले हिंदू धर्माचे वर्चस्व पुष्कळ वर्षापासून अबाधितपणे चालू ठेवले आहे. परंतु ब्राह्मणांना मी आव्हान देतो की, कोणत्याही निष्णात पंडिताने बौद्ध धर्माच्या तत्त्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी. माझी खात्री आहे की मी त्याचा पराभव केल्यावाचून कधीही राहाणार नाही. ( टाळ्या )

प्राचीन काळी हिन्दू धर्मात यज्ञविधिमध्ये गाईंचा बळी दिल्याने स्वर्गप्राप्ती होते, असे ब्राह्मण म्हणत असत. माझा त्यांना उघड सवाल आहे की, अशा रीतीने जितक्या कालावधीत स्वर्गप्राप्ती होत असेल त्यापेक्षाही लवकर आपल्या वडिलांचा बळी दिल्याने स्वर्गप्राप्ती होईल. मग हे लोक आपल्या बापाचा बळी का देत नाहीत. एकेकाळी अशारितीने वागणारे ब्राह्मण आता गोहत्या प्रतिबंधक प्रचार करीत आहेत. हा एक गौतम बुद्धाच्या अहिंसा तत्त्वाचा मोठा विजय होय.

ब्राह्मणाव्यतिरिक्त ब्राह्मणेतर पक्ष भारतात संखेने बराच मोठा आहे. धर्माच्याविषयी त्यांचीही स्थिती केविलवाणी झाली आहे. हजारो देव देवता या देशामध्ये ब्राह्मणांनी निर्माण केल्या आहेत. कोणत्या देवाची उपासना केल्याने मोक्ष-मुक्ती मिळेल हे त्यांनाही समजत नाही. आपल्या बौद्ध धर्मात मोक्ष-स्वर्ग या खुळ्या कल्पनांना स्थान नाही. उलट मानवी जीवित सुखसमाधानाने घालवावयाचे असेल तर मानवाने शुद्धाचरण, अहिंसा,समता आणि बंधुत्व या गोष्टींचाच अवलंब करावा. त्याशिवाय त्याला दुसरा मार्गच नाही. या गोष्टी गौतम बुद्धाच्या धर्मातील तत्त्वे म्हणून प्रसिद्ध आहेत आणि हीच तत्त्वे मी माझ्या सहा कोटी अनुयायांना सांगितली आहेत. ती त्यांना पटली