४-१२-१९५४ कोणत्याही निष्णात पंडिताने बौद्ध धमाच्या तत्त्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी मी त्याचा पराभव केल्यावाचून राहणार नाही - Page 454

४१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आहेत. पैशाच्या अभावी मी त्यांच्यासाठी आज काहीच करू शकलो नाही ; तरी पण उद्या अल्पावधीतच मला योग्य ती साधने उपलब्ध झाली की बौद्ध धर्माचा प्रसार भारतात केल्यावाचून मी कधीही राहाणार नाही. (टाळ्या)

मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्माच्या पुनरूत्थानाविषयी काही गोष्टी करून टाकल्या आहेत. भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी ती घटना तयार केली. तीत पाली भाषेच्या उत्थानाची योजना करून ठेवली आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या राजवाड्यावर गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील पहिलेच चरण-धम्मचक्र परिवर्तन-घातले असून ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष डॉ. जी. पी. मललशेखर याच्या दृष्टोत्पत्तीस आणले आहे. हे पाहून

त्यांनाही मोठे आश्‍चर्य वाटले.

तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोक चक्र हे भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. हे सर्व करताना मला हिंदू. मुसलमान, खिश्चन व पार्लमेंटच्या इतर सभासदांचा विशेष विरोध [झाला ] नाही. इतके स्पष्ट नि मुद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केले होते.

या तिसऱ्या अंतरराष्ट्रीय अधिवेशनाला जमलेल्या या अठ्ठावीस राष्ट्रांपैकी एखाद्या राष्ट्राने तरी असे केले आहे का ? एवढेच करून मी थांबलो नाही, तर मुंबई शहरात सिद्धार्थ नावाचे एक मोठे कॉलेज मी स्थापन केले आहे. तसेच अजिंठा, वेरूळ इकडे जाताना वाटेत औरंगाबाद येथेही दुसरे कॉलेज स्थापन केले आहे. मुंबईतील कॉलेजमध्ये २,९०० व औरंगाबाद येथे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या विद्यार्थ्याकडून गौतम बुद्धाच्या चरित्रावर प्रबंध लिहून घेऊन ज्याचा प्रबंध _ सरस ठरेल त्याला एक हजार रुपये देण्याचा माझा विचार आहे. हा प्रबंध लिहून ` घेण्याचा हेतू हा की, बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास त्यांनी करावा म्हणजे आपोआप बौद्ध धर्म प्रचाराचे काम होईल. या चढाओढीत पारशी, मुसलमान, हिंदू वगैरे धर्मातील विद्यार्थ्यांना भाग घेता येईल.

तसेच पुरेसा पैसा जमा झाल्यास दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास या शहरात बुद्ध विहार स्थापन करून प्रत्येक रविवारी लोकांच्या उपासनेची सोय करण्याचा माझा मानस आहे. मी स्थापन केलेल्या दोन्ही कॉलेजसाठी भारत सरकारकडून २२ लाख रुपये कर्ज घेतले आहे. डे कर्ज मी मरेपर्यंत फेडीन की नाही याची मला मोठी शंकाच वाटते. (हंशा)