४-१२-१९५४ कोणत्याही निष्णात पंडिताने बौद्ध धमाच्या तत्त्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी मी त्याचा पराभव केल्यावाचून राहणार नाही - Page 455

कोणत्याही निष्णात . . . . . केल्यावाचून राहाणार नाही ४१५

अशारितीने माझा या धर्माच्या बाबतीत प्रयत्न चालू आहे. जगात भारत हा असा एकच देश आहे की, जेथे बौद्ध धर्माचा प्रसार फारच थोड्या काळात करता येइल. शेतकरी जमीनीचा मगदूर पाहूनच तीत बी पेरतो, तद्वतच या भारत देशात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आवश्यक अशा अनुकूल गोष्टी आहेत. त्याचा आपण सर्व राष्ट्रांनी आर्थिक सहाय्य करून उपयोग करून ध्यावा, अशी माझी विनंती आहे. कोणी सहाय्य करो वा न करो, माझा मार्ग मी आक्रमिल्यावाचून राहाणार नाही, असे या सभागृहास मी आश्‍वासन | देतो. (टाळ्या)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण चालू असताना जगातील अङ्ठावीस राष्ट्रांचे | प्रतिनिधी हे भाषण शांत चित्ताने ऐकत होते.

७ ७ $

1