ब्रह्मदेशात अस्पृश्यता . . . . . . . प्रगती करता आली ४१७
गेल्या वेळी मी आपणास भेट देऊ शकलो नाही. त्यावेळी मी आजारी होतो. आता देखील मला पाहिजे तसे बरे वाटत नाही, तरी पण आपली पुन्हा | निराशा होऊ नये म्हणून आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. या | देशात राहाणाऱ्या आपल्या लोकांची. सांपत्तिक परिस्थिती. मला . चांगली वाटते. मी असे ऐकतो की, आपल्यातील साधा मजूरदेखील रोज दहा कॅटस-रुपये मिळवितो. तुमच्यापैकी काही लोक तांदळाचे व्यापारी आहेत कोणी टिम्बर मर्चटस्-लाकडाचे व्यापारी आहेत. आपापल्या धंद्यात तुम्ही . प्रगतिमान आहात, हे ऐकून मला समाधान वाटले. माझे सबंध आयुष्य मुंबईत गेले आहे. मुंबईतील आपल्या जनतेचेही माझ्यावर फार प्रेम आहे. ते सभा वगैरे भरवतात. पण तुमच्यासारखी टी पार्टी (चहांपान) त्यांनी मला अजून तैथील ताजमहाल हॉटेलमध्ये दिलेली नाही. यावरून तुमच्या व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत बरीच तफावत आहे असे दिसते. त्यांना असे का करता येत नाही, याचे कारण उघड आहे. तेथे अस्पृश्यता आहे. या देशात तिचे
नावही नाही
या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगाविशी वाटते की, ज्या या ब्रह्मदेशात ' सं
' अस्पृश्यता ' हा शब्द देखील माहीत नाही त्या देशात तुम्ही स्वतःला शेड्यूल्ड कास्ट्स् म्हणवून का घेता ? शेड्यूल्ड कास्ट्स् म्हणजे पददलित. आम्ही नीच-हलक्या जातीचे लोक आहोत, असे या ब्रह्मी लोकांना तुम्ही स्वतः होऊन का सांगता ? तेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट करा की शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन ही तुमची संस्थाच या देशातून नाहिशी करा. तुम्हास तुमची संघटनाच हवी असेल तर त्या संघटनेस मी तुम्हाला नवीन नाव सुचवीन पण स्वतःला शेड्यूल्ड कास्ट्स् म्हणवून घेऊ नका. तुमच्यासारखी वागणूक जर आम्हाला हिंदी सरकारने दिली, तर मी देखील भारतात शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन ही संस्था अजिबात बंद करीन. परंतु अशी समानतेची वागणूक आम्हाला मिळत नाही | आणि म्हणूनच आपल्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला शेड्यूल्ड कास्ट्स् - फेडरेशन ही संस्था ठेवावी लागली
दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगाविशी वाटते ती ही की, तुम्ही या देशात २०-२५ वर्षांहून अधिक काळ आहात. तर मग तुम्ही लोकांनी या देशाचे नागरिकत्व कां
पत्करले नाही. हिंदी नागरिकत्व चालू ठेवण्यात तुमचा काय फायदा
आहें. ज्या देशातील लोकांच्या नसानसातून विषमता भरलेली आहे,
अस्पृश्यतेचा मोठा कलंक ज्या देशाला लागलेला आहे, ज्या देशातील लोक
अस्पृश्य लोकांची आर्थिक उन्नती होऊ देत नाहीत, त्या देशाचे नागरिकत्व