२५-१२-१९५४ पंढरपूर येथे बौद्ध धमाचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन - Page 459

३२९
पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते
हे मी सिद्ध करून देईन

दिनांक २५ डिसेंब- १९५४ रोजी देहू रोड येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब.आंबेडकर यांच्या हस्ते भगवान बुद्धाच्या मूर्तीची विधीपूर्ण कृत्ये झाल्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली. ही मूर्ती सुमारे अडीच हजार रुपये किमतीची असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ती खास रंगूनहून आणली आहे. या समारंभाप्रसंगी सुमारे ४० हजारावर जनसमुदाय हजर होता.

अँडव्होकेट शंकरराव खरात, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश शे. का. फे. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. '

उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

आज या ठिकाणी या छोट्याशा मंदिरात भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना

करण्यात आली आहे. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एखादे मंदीर बांधण्यात आले तर त्यात भेरोबा, खंडोबा, मरीआई वगैरे नानाप्रकारच्या देवता ठेवल्या जातात. आपले लोक भाविक असल्यामुळे ते विष्णू शिव अशातऱ्हेच्या देवतांची स्थापना करतात. इथला प्रसंग नवीन आहे. इथल्या मंदिरात मरीआई, खंडोबा, महादेव आणलेला नाही. येथे आज हा नवा देव आणून स्थापला आहे. हा प्रसंग सर्वांच्या दृष्टीने आमच्यामध्ये नवीन आहे. आपल्यापैकी काही जणांनी भगवान बुद्धाचे नाव देखील ऐकले नसेल.

काही लोक म्हणतात की, हा नवीन देव कोठून आणला आहे ? हा देव कोठून आणला, त्याची उत्पत्ती कशी झाली याची चिकित्सा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बुद्ध भगवंताचा हा धर्म या देशामध्ये अत्यंत जुना आणि प्राचीन आहे. हा धर्म फार प्राचीनकाळी या देशात उगम पावला आहे. चीन, जपान, सयाम, इंग्लंड या बाहेरील देशातून हा धर्म येथे आणलेला नाही. हा वृक्ष येथेच उगवला

जनता : १ जानेवारी १९५५.