४२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आहे. या देवाला येथे कोणी आणले याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. या देवाला येथे कोणी आणले याबद्दलचा पहिला खुलासा असा करता येईल की, या देशातील पुरातन देवता आपल्याला ठिकठिकाणी सापडतात. तो इथलाच आहे.
इतिहासाच्या काळामध्ये जी अनेक कारणे घडली त्यामुळे या धर्माचा लोप झाला. या धर्माचे शत्रु या देशात राहूच शकत नाहीत. आपण मराठीमध्ये शत्रुला बोलताना म्हणतो की, 'माझा देव जागती ज्योत आहे. माझा देव काही कच्चा नाही. तुझ्यावर सोडीन तर तुझा सत्यानाश करील.' त्याचप्रमाणे या धर्माचे आहे. आज मी असे भाकीत करतो. हे पाहायला कदाचित मी जगणार नाही. मात्र ही गोष्ट होईल यात तिळमात्र शंका नाही. एक मनुष्य काही माणसांना काही काळ फसवू शकतो. एक मनुष्य सर्व लोकांना सर्व काळ फसवू
शकत नाही. | |
बुद्ध धर्माला १९५६ साली अडीच हजार वर्षे पुरी होतील. हा धर्म साडेबाराशे वर्षे जिवंत असा होता; हे सिद्ध करण्यासाठी आज मी इतिहासातील पुरादा देणार आहे. पूर्वी या देशावर मुसलमानांच्या स्वाऱ्या झाल्या. मुसलमान मूर्तिपूजक नसतात. त्यांनी बुद्ध धर्माच्या लोकांवर हल्ला चढविल्यामुळे हा धर्म खालावला. अफगाणातील शंभर टक्के लोक बुद्ध धर्माचे होते. तेथे बुद्ध धर्म होता. येथे बुद्ध धर्मात सात हजार भिक्षु होते. या मुसलमानांनी त्यांच्यावर स्वाऱ्या केल्या त्यावेळी त्या मुसलमानांपुढे दोनच प्रश्न होते. या देशातील लोकांनी मुसलमान धर्माचा स्वीकार करावा, हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे जो हा धर्म स्वीकारणार नाही त्यांची कत्तल करणे. त्यांनी या सात हजार भिक्षुंची कत्तल केली.
हा धर्म जिवंत होता तेव्हा तो फार प्रभावी होता. या देशात नालंदा विश्वविद्यालय होते. ज्ञानप्राप्ती करून देणे हे या धर्माचे तत्त्व होते. एक आचार्य व त्यांचे १० पोरे एकत्र बसत आणि ब्राह्मण शास्त्र शिकवित. अशीया धर्माची स्थिती नव्हती. |
पहिले विश्वविद्यालय बौद्ध धर्मीय लोकांनी स्थापन केले. नालंदा
विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी व एक हजार अध्यापक होते. ब्राह्मण धर्म हा एकांगी होता. अन्य कारणांमुळे मुसलमानांच्या तडाख्यातून त्याचा बचाव
झाला. बौद्द धर्माविरूद्ध ब्राह्मणांची कारस्थाने चालू होती. यामुळे तो खाली पडला. ॒