२५-१२-१९५४ पंढरपूर येथे बौद्ध धमाचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन - Page 461

पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे . . . . हे मी सिद्ध करून देईन ४२१

बुद्ध धर्मावर मी इंग्रजीतून पुस्तक लिहीत आहे. हे पुस्तक दोन महिन्यांनी प्रकाशित होईल. या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून ते छापण्यात येईल.

तुमचा बौद्ध धर्म एवढा चांगला होता तर त्याचा ऱ्हास का झाला ? असे माझे काही मित्र मला प्रश्‍न विचारतात. तेव्हा मी त्यांना असे विचारतो की, हा धर्म वाईट आहे म्हणून या धर्माचा ऱ्हास झाला असे म्हणावे तर चीन, जपान, कंबोडीया, सिलोन या देशांमध्ये या धर्माचा ऱ्हास का झाला नाही ? तेथे अजून तो का टिकून आहे ? या देशात हा धर्म नाहिसा झाला नाही तर त्याला निराळी वाळवी लागली असेल, कारस्थाने झाली असतील. सांगायचा मतलब असा की, त्याच्या. निर्मितीपासून तो साडेबाराशे वर्षेपर्यंत यच्चयावत चालला होता. हा इतिहास इतिहासकारांनी लपवून ठेवला आहे. यावेळी मी सबंध भारताविषयी बोलणार नाही. फक्त महाराष्ट्रासंबंधी सांगणार आहे. आपला महाराष्ट्र he टक्के बौद्ध धर्मीय होता आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील अ कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील. भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत. ही लेणी म्हणजे बौद्ध भिक्षुंची राहाण्याची ठिकाणे होती. हेच त्यांचे निवाऱ्याचे स्थान होते. महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत, असे सांगण्यात येते. परंतु विराटनगरी कोठे व

पांडवाचे राज्य कोठे ?

या विहारामध्ये २५ भिक्षु असतात. पंधरा हजार विहारातून सुमारे पस्तीस

हजार भिक्षु राहात असत. जनतेकडून भिक्षा मागून ते आपली उपजीविका

करीत. भिक्षा मागून त्यांचे कार्य चालत असे. एक हजार दोनशे पन्नास वर्षे

ते या प्रांतामध्ये होते. आपण मोडके घर पुन्हा बांधतो. त्याला नवीन पत्रा

टाकतो. छप्पर नवीन बसवितो. म्हणजेच त्या घराचा जीर्णोद्धार

करतो. आपल्या वाडवडिलांपासून भगवंताची पूजा आपण करीत आलो

आहो. तोच देव आपल्याला पुन्हा बसवावयाचा आहे. या देशात धर्म म्हणून

काही राहिलेला नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. हिंदू लोकांची धर्माची.

व्याख्या फार निराळी आहे. देवळात जाणे, घंटा वाजविणे, पूजा करणे आणि

भटाला दोन पैसे देणे एवढेच या धर्माचे कार्य! जणू काही भटाच्या बापाचे

ऋण फेडणे होय. परंतु आम्हाला काही हे जमले नाही. ` विष्णूची पूजा

करून विष्णू पावला नाही, शिवाच्या देवळात जाऊन शिव पावला नाही आणि

मरीआई, म्हसोबा, खंडोबा तर पावलाच नाही. व्यक्तिच्या व समाजाच्या

जीवनाला आवश्यक म्हणून धर्म हवा आहे. धर्माला नीतीचे बंधन हवे

आहे. काही लोक मला विचारतात की, धर्म काय करावयाचा आहे, परंतु माझा