डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४२२
सोडली आहे. केवळ पोटच त्यांना सवाल आहे की, आम्ही डल्ली खावयाची
भरावयाचे तर मग तुम्हीही डल्ली, सागोती का खात नाही? धर्म हा दुराचरणावर नियंत्रण ठेवतो. तुम्हाला सांगण्यासारखे पुष्कळ आहे. पण तुमच्या भाषेत मला काय सांगता येईल ? येथे उदाहरणादाखल मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. बैलगाडीला दोन चाके, दोन बैल, गाडा तसेच हाकणारा मनुष्य वगैरे सर्व असते. मी लहानपणी बैल हाकायचे काम केले आहे. गाडीला वंगण असते, चाकाला खीळ. असेल तर बैल गाडा ओढतील. त्याचप्रमाणे मनुष्याच्या पापी, दुराचारी वर्तनाला बंधन म्हणजेच धर्म ! धर्माचे बंधन असल्याशिवाय कार्य टिकू शकत नाही.
कोणताही धर्म घेताना चोखाळून घेतला पाहिजे. आपण बाजारात जातो, सोनेंढैबावनकशी आहे किंवा नाही याची खात्री करून घेतो. त्याचप्रमाणे धर्म म्हणजे बाजारपेठ आहे. ते विष्णुचे, ते शिवाचे, रामाचे दुकान आहे. तेथे पुजारी धूप, कापूर जाळत बसले आहेत. कृष्ण, राम, शिव, विष्णू यांचा धर्म हा
असा धर्म आहे. धर्म मनुष्याचा उद्धार करतो. धर्म घात करण्याकरिता नसतो. आमची अवनती झाली असेल तर ती जातीभेदामुळे ! जो धर्म जातीभेदाने बरबटलेला आहे, ज्या धर्मात असमानता आहे तो धर्म आम्ही कसा घेऊ ? ज्या धर्मात समानता अधिष्ठित झाली आहे असा धर्म पाहिजे. बौद्ध धर्मात सर्वाना समान संधी व सर्वाना समान अधिकार दिलेला आहे. त्यात
ऐक्यता आहे. भेदभाव नाही.
ह्या प्रसंगी आपणाला एका सुक्ताची आठवण करून द्यावीशी वाटते. ब्राह्मणाची पोरे होती, त्यांच्यामध्ये तत्त्वज्ञानाविषयी वाद चालू होता, ' ब्रह्म हे घर आहे व आत्मा ब्रह्माची छाया आहे. सूर्य आणि सूर्याचे प्रतिबिंब, घर आणि त्याची छाया याप्रमाणे ब्रह्म आणि आत्मा याचे आहे.' ही सगळी पुराणातील वांगी आहेत. ब्रह्माची जर छायाच आत्मा आहे तर अस्पृश्यांना शनिवार वाड्यातील हौदात पाणी का भरू देत नाही? हा वाद मिटत नाही. असे पाहून ती पोरे बुद्धाजवळ
गेली. त्यांना ब्राह्मणांचे तत्त्वज्ञान पटलेले नव्हते. भगवंतानी त्यांना विचारले : हे ब्रह्म सत्य आहे काय ? तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय ? ते काही काळासाठी आहे की नित्य आहे ! त्याचं रंगरूप कसं काय आहे ? ते काही बोलते काय ? त्याला चव आहे का सुगंध आहे ? ते गुलाबाच्या फुलासारखे आहे की चाफ्याच्या ? ते गोड आहे, तिखट आहे की आंबट आहे ?