२५-१२-१९५४ पंढरपूर येथे बौद्ध धमाचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन - Page 463

पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे . . . . हे मी सिद्ध करून देईन ४२३

मनुष्यमात्राला सत्य कळण्याकरिता पाच इंद्रिये आहेत. डोळा, कान, नाक, जीभ वगैरे हीच ती पाच इंद्रिये होत. डोळ्याने पाहाता येते, कानाने ऐकायला येते, नाकाने सुगंधित आहे की दुर्गधित आहे असा वास कळतो. जिभेने खारट, तिखट, आंबट चव कळते. पाच इंद्रियांची साक्ष ज्याला मिळते तेच सत्य. ब्रह्म सत्य मानणे म्हणजे न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करण्यासारखे आहे. बुद्ध भगवानाचा धर्म हा समानतेचा धर्म आहे. नुकताच माझ्याविषयी श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एक लेख लिहिला असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. माझ्याविषयी सहसा कोणी लिहीत नाही आणि लिहिलेच तर ते चांगले असेलच हे सांगता यायचं नाही. श्री. जोशी यांनी आपल्या लेखाच्या शेवटी डॉ. आंबेडकरांचे अवतारकार्य आता संपले असे लिहिले आहे. पण माझे अवतारकार्य संपले नसून त्याला सुरवात होणार आहे. लक्ष्मण- शास्त्रीसारखा विद्वान मनुष्य असं लिहितो याला काय म्हणावे? आम्ही महाडचा सत्याग्रह केला. तुम्ही हिन्दू लोक आम्हाला हिन्दू म्हणता ना ! मग हे लोक आपल्याला पाणी प्यायला देतात किंवा नाही हेच पाहाण्यासाठी हा सत्याग्रह केला होता. आपल्याला देवळात जाऊ देतात की नाही हे बघण्यासाठी मंदीर प्रवेशाची चळवळ केली. इतके दिवस नांगरट झाली, जमीन आता पेरायला उपयोगी झाली आहे. माझे आयुष्य आता थोडे राहिले आहे. ' दुर्दैवाने जी सामाजिक कार्ये माझ्या. हाती होती ती माझ्याकडून पूर्ण झाली नाहीत. मी आता इतर सर्व कार्यातून निवृत्त होणार आहे. मला बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावयाचे आहे. आजचा हा आपला प्रसंग पाहून काही लोक आपला उपहास करतील. परंतु चांगले कार्य हे अवघड असते. महार जात धैर्यवान आहे. तिच्या डोक्यावर इतर जमाती आहेत. लंगोटी, कांबळी, काठी हाच त्याचा पोषाख. जैन साघु नग्न हिंडतात. त्याचप्रमाणे आम्ही नग्न हिंडू

मला आपणाला दोन गोष्टी सांगावयाच्या आहेत. तुम्ही या धर्माचा स्वीकार कराल त्या दिवशी बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. एकादशीला पंढरपूरला जाणे, द्वादशीला इतर क्षेत्राला जाणे बंद करायला हवे. मला चांगली

आठवण आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे कुंड होते. या कुंडात फक्त

पसाभर पाणी होते. यात्रेकरू लोक त्यात फडके भिजवून घेऊन अंगाला चोळीत अशा तऱ्हेची खिचडी मी बौद्ध धर्मात होऊ देणार नाही. स्वच्छ पाण्यात घाणेरडे पाणी ओतता कामा नये. भगवान बुद्धाचा धर्म तोच आमचा धर्म, असा आता आम्ही निश्‍चय केला आहे. तुम्ही पंढरपूरला जाता, पांडुरंगाचे अभंग म्हणता. पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल