हिंदू धर्मात देव. . . . जीवनाला कोठे आहे ? ४२७
माझे वडील म्हणत असत की, आपण गरीब आहोत. पण आपली महत्त्वाकांक्षा अत्यंत दांडगी पाहिजे. महाभारतातील द्रोणाचार्य गरीब होते. द्रोणाच्या मुलांना त्याची आई पाण्यात बाजरीचे पीठ मिसळून दूध म्हणून पाजित असे. कर्ण हा गरीबीतूनच वर आला. थोर पुरुष नेहमी गरीबीतून जन्माला येतात. हाती पडलेले गौतम बुद्धाचे चरित्र वाचून माझे मन डळमळू लागले आणि मग इतर धर्मग्रंथांचे पठण मला बरोबर वाटले नाही. वडील ` वारल्यानंतर अशा धर्मग्रंथ पठणाची ब्याद माझ्या मागून निघून गेली.
उच्च शिक्षणासाठी म्हणून मी अमेरिकेला गेलो. तेथेही बुद्ध धर्माचा बराच अभ्यास केला. बुद्ध धर्म काय आहे हे समजावून घेण्याकरिता व बुद्ध धर्म-चरित्राने मनात उडविलेली खळबळ शमविण्याकरिता मी तेथे बरेच वाचन केले. बराच विचार केला. तेव्हा हिंदू धर्म व बुद्ध धर्म यातील. अंतर मला कळून चुकले. बौद्ध धर्माचे माझे वेड बरेच पुरातन आहे.
लोक म्हणतात राजकारणात माझी हानी झाली. आता बुद्ध धर्मानेही माझे नुकसान होणार आहे. परंतु नुकसान माझे होणार आहे, ते नुकसान सोसण्यास मी तयार आहे. धर्म ही माझी खाजगी बाब आहे. बुद्ध धर्म मला पटला. तो मी उचलला. राजकारणातील खोट्या निवडणुका मला नको आहेत. खोट्या निवडणुकांनी मी महामंत्री सुद्धा होऊ शकेन ; पण ते मला नको. राजकारण म्हणजे क्रिकेटचा खेळ नव्हे. तो एक सांप्रदाय आहे. रामानंदी, कबीरपंथी माणसाला तू पंथ सोड, असे सांगितल्याने तो पंथ सोडणार नाही. त्याचप्रमाणे माझा धर्म अटळ आहे. हा धर्म मी एकदा स्वीकारला, मग मला त्या मार्गानेच
गेले पाहिजे. |
बौद्ध धर्म मी स्वीकारला आहे. तुम्हीही स्वीकारा. नुसत्या अस्पृश्य समाजानेच तो स्वीकारून चालणार नाही तर साऱ्या भारताने व त्याबरोबर साऱ्या जगानेही बुद्ध धर्म स्वीकारावा, अशी माझी इच्छा आहे. ( टाळ्या )
बुद्ध धर्म मी का स्वीकारला, ते तुम्हास सांगतो. याची कारणमीमांसा करणे योग्य आहे. गौतम बुद्धाला पहिल्या प्रथम पाच शिष्य मिळाले. त्यांना ' पंचवर्गीय भिक्खु ' असे म्हणतात. एकंदर चाळीस शिष्य झाल्यानंतर बुद्धाला वाटले आपण शिष्यांना अनुज्ञा करावी. धर्मप्रचारासाठी दूरदूर