१४-१-१९५५ हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? - Page 469

हिंदू धर्मात देव. . . . जीवनाला कोठे आहे ? ४२९

हिंदू शब्दाच्या व्याख्येतील बेबनाव व बेबंदशाही खरोखरच हास्यास्पद (आहे. कुणाचाही ताळमेळ बसत नाही. सावरकरांची हिंदू शब्दाची व्याख्या 'पाहा-

' आसिधुः सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका |

पितृभुभुः पुण्यभुश्चैव सवै हिंदु: इति उच्यते ||

तर राधाकृष्णन्‌ यांची व्याख्या काही निराळीच आहे. ती टिळकांच्या व्याख्येशी

जुळते घेत नाही. टिळकांचा ' हिंदू ' म्हणजे-

' प्रामाण्यं बुद्धिर्वेदषु साधनानाम्‌ अनेकता उपास्या नाम नियमः '

असे मानणारा आहे. टिळकांच्या दृष्टीने ' हिंदू ' म्हणजे वेदांना प्रमाण

मानणारा पुरुष. मग धर्माचरणात त्याची साधना काही जरी असली तरी

चालेल. एखाद्या हिंदू मनुष्याने वेदांना प्राधान्य देऊन ' पिराची ' जरी पूजा

केली तरी हरकत नाही, तो हिंदूच. टिळकांच्या या व्याख्येला काय ठाव

आहे. मग सांगा, असा धर्म ' बहुजन हिताय, बहुजन सुखाय ' होईल काय ?

(टाळ्या )..

बुद्ध धर्माची प्रतिष्ठापना पाहून बऱ्याच लोकांनी कोल्हेकुई सुरू केली

आहे. वर्तमानपत्रातून ओरड केली. पण मला आताच त्यांच्याकडे पाहावयास

वेळ नाही. एकदा सर्वाचे लिखाण होऊन जाऊ दे. माझ्याविरुद्ध कोण कोण

काय लिहितात हे बघू. त्यांची लेखणी बंद झाली म्हणजे मी माझी लेखणी

उचलीन.

धर्म हा प्रत्येक मनुष्यमात्राच्या जीवनाला अत्यंत आवश्यक व पोषक

आहे. इतर धर्माप्रमाणे आत्मा आहे काय ? तो कोठे बसला आहे, हे मला

माहीत नाही. आंगठ्याएवढा आहे, की तो काळजाजवळ बसला आहे, कोणास

ठाऊक ? देव मला अजून दिसला नाही. हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा

आहे. पण मनुष्याच्या जीवनाला कोठे जागा आहे ?

बुद्ध धर्मात मात्र भेदभाव नाही. सर्वत्र समसमानता आढळून

येईल. बुद्धधर्मात देव, आत्मा यांचा विचार केलेला नसून माणसाने माणसाशी

कशा प्रकारे वागले पाहिजे, याचा विचार केलेला आढळतो. या धर्मात नीतीचे

संबंध सांगितले आहेत. म्हणून हा सत्धर्म आहे. बाकीचे धर्म झूट आहेत. ` ब्राह्मण आणि पुजाऱ्यांनी हिंदू धर्म बनविला आहे. बुद्ध धर्मात मोक्ष मिळवून , देण्यासाठी खिश्चन लोकांसारखे पाद्री नाहीत व आत्म्यास सद्गती देणारे,

| पूजाविधी व यज्ञयाग करणारे ब्राह्मण तर मुळीच नाहीत.

वि (वाय) ४११--२९