१४-१-१९५५ हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? - Page 471

हिंदू धर्मात देव. . . . जीवनाला कोठे आहे ? ४३१

खिस्ती धर्मात व बुद्ध धर्मात अंतर आहे. खिस्ती धर्मात येशुने सांगितले आहे की, गरीब लोकहो, तुम्ही दारिद्र्याला भिऊ नका. मेल्यावर सारे जग तुमचेच

आहे. (हंशा) अशी बुद्ध धर्मात आर्थिक बाब डावललेली नाही.

एकदा अनाथपिंडीकाने भगवंताला आर्थिक बाबीबद्दल प्रश्‍न विचारला होता. तेव्हा भगवंताने उत्तर दिले, ”' संपत्ती ही मानवी जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. संपत्ती गोळा करावी. पण तिचा उपयोग दुसऱ्याला नाडण्यासाठी, गुलामगिरीत डांबण्यासाठी कधीही करू नये. ती शुद्ध साधनांनी मिळवून तिचा सदुपयोग झाला पाहिजे.” धर्म व अर्थ या दोन्हीही गोष्टी माणसाला अत्यंत आवश्यक आहेत. जीवनोपयोगी वस्तुंच्यासाठी धर्म व अर्थही पाहिजेत. [

वर्षातून एकदा तरी शेती नांगरण्याचे काम मालकाने केले पाहिजे, अशी शाक्य लोकात रूढी होती. त्याप्रमाणे भगवंताने वडिलांना प्रश्‍न केला " दुसऱ्याच्या कष्टाचे फळ आम्ही खावे हे रास्त आहे काय ?'” आमचे अन्न आम्हीच कष्टाने मिळवून खाल्ले पाहिजे. धर्म व अर्थ या दोन्हीही गोष्टी जोडीनेच केल्या पाहिजे. तेव्हा आपल्या योजनेने आर्थिक हानी होईल हे त्यांनी मला पटवून द्यावे. नुसत्या अर्थानेही अनर्थ होईल. अर्थामध्ये धर्म हवा आहे.

कम्युनिझम हा कसा जगला ? तो कसा टिकून राहिला ? ही शक्तीची बाब आहे. शक्ती आणि जबरदस्तीने तो टिकला आहे. त्यांना प्रॉपर्टी, मालमत्ता हवी. रशियामध्ये प्रापर्टीसाठी यादवी माजली आहे. रशियातील कडक शिस्त बाळगणारे जमीनदार लुप्त होताच लोक उसळी मारून उठतील, बेबंदशाही माजेल आणि मग समाजाचा व्यवहार बेबंदशाहीने चालू

लागेल. बुद्धाचा धर्म कम्युनिझममध्ये आहे. बुद्ध धर्मातील भिक्षुंप्रमाणेच कम्युनिस्टांना ठराविक जीवनोपयोगी वस्तू ठेवण्याचा अधिकार आहे. तांब्या, पाणी गाळण्यासाठी कापड व वस्तरा या तीन वस्तू होत.

भगवान बुद्धाचा अंत होऊन २ हजार वर्षे लोटली पण अजूनही हा धर्म जोमाने फोफावतो आहे, त्याला कुणी शास्ता नाही की सर्वाधिकारी नाही. अंतःकाळी भगवंताला त्यांच्या शिष्याने विचारले, ' भगवंत तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पश्चात या धर्माचे काय होणार ? याला कुणी तरी शास्ता ठेवा ' तेव्हा भगवंताने उत्तर दिले की " माझ्या गैरहजेरीत धर्म हाच तुमचा शास्ता आहे. तो जर पाळीत नसाल तर त्याचा काय उपयोग ? विशुद्ध मनाने घेतलेला धर्म हाच तुमचा

शास्ता. ''

र चि (वायी ४११--२९-अ का