१४-१-१९५५ हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? - Page 473

हिंदू धर्मात देव. . . . जीवनाला कोठे आहे ? ४3३३

मंडाले पर्वतावरील बुद्धाचे मंदीर मी पाहावयास गेलो. मंदीर बघण्यासाठी मी १,०८० पायऱ्या चढलो. अर्थात्‌ मनाचा निश्चय म्हणून. एरव्ही मला _ चढायला त्रास होतो. या मंदिरात बुद्धाची १४ फूट उंचीची उभी मूर्ती आहे. ही संपूर्ण सोन्याची बनविलेली आहे. तेथेच उंच ठिकाणी एक पागोडा बांधला आहे. त्यात जवळ जवळ अर्धा कोटी रुपयाचे सोने आहे. सकाळी ते रात्री ११ वाजेपर्यंत लोक प्रार्थनेला येतात व जातात. रात्री ११ नंतर तेथे कोणी बसत नाही. मूर्तीला जवळ जवळ ६०० वर्ष झालीत. पण कोणीही गुंजभर सोने चोरलेले नाही. पण आमचे इकडे देवीचे दागिने ब्राह्मण पुजारीच चोरून नेतो. (हंशा)

तेथील लोक खोटे बोलत नाहीत. चोरी करीत नाहीत. कारण बुद्ध धर्माची शिकवणच तशी आहे.

येथे जोपर्यंत हिंदू धर्म आहे तोपर्यंत महारवाडा, मांगवाडा हे राहाणारच. या धर्माची नीतीच अशी आहे. झुणकाभाकरीसारखा कार्यक्रम धर्म व रूढी यात बदल करू शकत नाहीत. समाजसुधारणेचे घोंगडे पांघरणारे ब्राह्मण, धर्ममार्तंड जोपर्यंत येथे आहेत तोपर्यंत हे असंच चालणार. झुणकाभाकर, सत्यनारायण करणाऱ्यांनीही बुद्ध धमति यावे, असे माझे सांगणे आहे. |

एकदा बुद्धाला विशाखा नावाच्या शिष्याने प्रश्‍न विचारला की ' धर्म म्हणजे काय ? ' “ मलीन मनाला साफ करणे हाच धर्म होय “ असे उत्तर मिळाले. अस्पृश्यता काही रस्त्यात पडलेला धोंडा नाही, की समाजसुधारकांना बाजूला फेकून देता येईल. जेव्हा आपला मनोधर्म बदलेल तेव्हाच धर्म बदलेल.

जगात प्रथम धर्माची आवश्यकता खालच्या लोकांना वाटू लागली. रोमन

इटालियन साम्राज्यात खिस्ती धर्म प्रथम गरिबांनीच स्वीकारला.

ह्या देशाची संस्कृती एकस्वरूप आहे, असा विद्वानांचा दावा आहे पण त्यांचा

इतिहास खोटा आहे. येथे संस्कृतीचे दोन प्रवाह सुरू आहेत. एक ब्राह्मणी

धर्म व दुसरा बौद्ध धर्म. ब्राह्मणी धर्माचं घाण पाणी बुद्ध धर्माच्या स्वच्छ पाण्यात

एक झालं. हिंदू धर्माच्या घाण पाण्याला नाली काढून स्वच्छ पाणी बाजूला काढू

या.

कष्णाने गीतेत काय सांगितले आहे ? मारा, हत्त्या करा. गरिबांच्या

उद्धाराबद्दल काही सांगितले आहे ? तिचा काही उपयोग नाही. मी गीतेवर

लिहिणार आहे.