४३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मी या धर्माची माहिती मिळविण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आहे. हा धर्म कसा खालावला याची कारणमीमांसा मी लिहीत असलेल्या पुस्तकात करणार आहे. धर्मांतरासाठी घाई करणार नाही, आताच तुम्हाला मेन्ढरासारखा घेऊन जाणार नाही. त्यासाठी मी एक पुस्तक लिहितोय.
बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या नियमानुसार वागायला पाहिजे. तरवारीच्या धारेप्रमाणे आचरण करणारे पाचच अनुयायी जरी मिळाले तरी पुष्कळ झाले ! |
नंतर श्री. संत गाडगे महाराज व इतरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केल्यावर सभा विसजित झाली.