| ३३१
लोकशाहीचे दोन शत्रु-एक, हुकूमशाही आणि
दोन, माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती
ही सभा ब्रह्मदेशातील सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश यू चॅन टयून (107१06 Justice U Chan Htoon, Judge of the Supreme Court of the Union of
B14 ) यांच्या सत्काराप्रित्यर्थ दिनांक ३ एप्रिल १९५५ रोजी मुंबई येथील बुद्ध
भुवन, सिद्धार्थ कॉलेज येथे भरविण्यात आली. या प्रसंगी डॉ, बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुनो,
लोकशाहीचे प्रामुख्याने दोन शत्रु आहेत. एक म्हणजे हुकूमशाही आणि दुसरी म्हणजे माणसा-माणसात भेद मानणारी नीती किंवा संस्कृती. अमेरिकन स्वातंत्र्यासंबधी उद्गार काढताना बकल प्रतिपादितो की, हुकूमशाहीमुळे निर्माण झालेली शक्ती किंवा सामाजिक संघटना कायम टिकू शकत नाही. कारण हुकूमशाही प्रेरणा ही मुळातच अबाधित स्वरूपाची नाही. ती प्रेरणा काढून घेतली की, ती संघटना गडगड़ते आणि म्हणूनच कम्युनिझमची राजवट ही अबाधित नाही. त्याप्रमाणे माणसा-माणसात भेद करणारी नीती, सामाजिक, आर्थिक भेद बुद्धिपुरःसर करणारी संस्कृती ह्या दोन्हीही लोकशाही स्वरूपाला मोठे
धोके आहेत.
हिंदू धर्मापुरते बोलावयाचे झाल्यास त्याचे प्रामुख्याने तीन ढोबळ वर्ग पडतील. पहिला खालचा पददलित वर्ग, ह्या वर्गाची सामाजिक व आर्थिक गळचेपी धर्माने घालून दिलेली आहे. दुसरा वर्ग हा ब्राह्मणेतर व मागासलेले वर्ग यांचा आहे. हा वर्ग तुलनात्मकदृष्ट्या स्थितिप्रज्ञ असा आहे. या वर्गात स्थित्यंतर व बदल व्हायला शिक्षणाच्या अभावी, नव्या जाणिवेच्या अभाव्री थोड़ा जास्त वेळ लागेल. तिसरा व शेवटचा वर्ग म्हणजे ब्राह्मण व तत्सम जातींचा आहे. या वर्गासाठी मात्र या धर्मात विशिष्ट अधिकार व हक्क आहेत. हा वर्ग त्यांच्या अधिकारावर व उपभोगावर अतिक्रमण झाल्यावर कालानुरूप बदल तर राहोच पण वेळी प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना धर्माने
जनता : ९ एप्रिल १९५५.