४३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दिलेले उच्च स्थान टिकवायचे आहे व म्हणूनच त्यांना अशातऱ्हेचा धर्म मुद्दाम टिकवावयाचा आहे. त्यांची दृष्टी होणाऱ्या बदलाकडे अधिरतेने पाहाते व त्यांचे विचार वेदापलीकड़े निर्भेळपणे (Intellectual interpretation) पाहू शकल नाही. पण मी बहुजन समाजाची उपेक्षा करू शकत नाही आणि म्हणूनच मी माझ्यावरची सर्व टीका लक्षात घेऊनही बुद्ध धर्माच्या या देशातील भविष्याविषयी अगदी आशावादी आहे.
ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, पोटातून वैश्य व पायातून शूद्र निर्मिती यावर आधारभूत झालेली हिंदू धर्मरचना ही मानवतेचा अपमान करणारी, बुद्धिचा भेद करणारी व ईश्वराचा द्रोह करणारी अशीच आहे आणि अशातत्हेच्या धर्मरचनेत समता कधीच नांदू शकत नाही, व्यक्तिविकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच संपूर्ण विचाराअंती मला वाटते की, खालच्या वर्गाने या विचारसरणीविरूद्ध बंड पुकारले पाहिजे, नव्हे, ती त्यागिली पाहिजे. याचा अर्थ असा की, अशातऱ्हेचा हा धर्म सोडून सर्व समतेची-मानवी ऐक्याची घालून दिलेली बुद्धाची शिकवणूक त्याने अंगिकारली पाहिजे. म्हणून माझ्या सर्व बांधवांना शेवटची हाक देत आहे की, मुक्ती साधावयाची असेल तर बौद्ध धर्माची दीक्षा घ्या. पाश्चिमात्य इतिहासाकडे पाहिले तर राज्य आणि धर्म (State and Church ) यांचे विभक्तीकरण करून जी युद्धे झाली ती त्या इतिहासातील मोठी चूक आहे. धर्माची मानवी जीवनातून अशी फारकत करता येत नाही. धर्म उलट मानवी जीवनाचे सर्वांग आहे ; अधिष्ठान आहे. ती सर्व बाबींची मूळ अंतःप्रेरणा आहे. ही गोष्ट कुणीही विचारवंत दुर्लक्ष शकत नाहीत. रोमचा ऱ्हास (Fall and decline ० ROMe ) ह्या गीबनने लिहिलेल्या पुस्तकातील काही भाग वाचला तर एक गोष्ट स्पष्टपणे निदर्शनाला येते की, खिश्चन धर्माची चाहूल लागताच -उमरावांच्या (P४०५७) जुलूमाला कंटाळून निवाऱ्यावाचून संध्याकाळच्या जेवणाची फिकीर करीत रस्त्यावर भटकणाऱ्या गुलामांनीच तो पहिल्यांदा जीवनमुक्ती (581४81०१) म्हणून कवटाळला. रोम देशात गुलामांनीच खिश्चन धर्माचे पहिले पाऊल उमटविले हा एक मोठा ऐतिहासिक दाखला (1०८३! !108॥४/) आहे आणि म्हणून भोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन करता आपल्यावर होणाऱ्या अन्याय (॥१।८७०७) व जुलूमातून (707५7९ ) बुद्ध धर्माचे बिजारोपण झाल्याशिवाय राहाणार नाही.
हिंदू धर्म विषमतेवर (315०01118॥01) आधारभूत झाल्याचे मी स्पष्ट केले आहेच व दुसरा मोठा पौर्वात्य धर्म-मुसलमानी धर्म (\७// ताठला ) हा होय. हा धर्म बंधुभावाबद्दल (87०१९-१००५) ख्यातनाम आहे. पण ही बंधुता त्यांच्या