३-४-१९५५ लोकशाहीचे दोन शत्रू-एक, हुकूमशाही आणि दोन, माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती - Page 477

लोकशाहीचे दोन शत्रु, . . . . भेद मानणारी संस्कृती ४३७

धर्मापुरतीच मर्यादित आहे. त्यात प्रामुख्याने मानवता (Human brotherhood) याचा अभाव आहे. बौद्ध धर्मच सर्व मानवांना समानतेचे अधिकार दोतो. त्या धर्मातच मानवी जीवनातील योग्य तो आदर ( Respect for human being) आहे. त्यात अशातर्‍्हेची भेदनीती (Discrimination). नाही. बौद्ध धर्म हाच खरा समतेचा धर्म आहे. मी या कार्याला थोडा उशीर केला. याबद्दल मला थोड़े वाईट वाटते. नाहीतर मी आजमितीला त्या बिजारोपणाची फळं पाहिली असती. माझ्या समाजातील शेकडा ९० लोक माझ्या म्हणण्याला रूकार देतील याबद्दल मला यत्किंचितही संदेह वाटत नाही. टीकाकार काहीही म्हणोत. मला मात्र बौद्ध धर्माचे या देशात पुनः जोमाने पुनर्जीवन होणार आहे याचे स्पष्ट दृश्य (॥॥७०॥ ) दिसत आहे व त्याबद्दल मला तिळमात्रही संदेह वाटत

नाही. |

सद्यःस्थितीत माणसाला धर्माची काय जरूर आहे, अशा अर्थाची टीका काही लोक करतात. पण मला वाटते हे लोक मानवी समाजाच्या धारणेसाठी धर्माची किती आवश्यकता आहे हीच गोष्ट विसरतात. मानवी समाजाला धर्माने दोन देणग्या दिल्या आहेत आणि त्या म्हणजे मानवी जीवनात ऐक्य अबाधित करणारी

मानसिक प्रेरणा निर्माण करणे. धर्मामुळेच मानवी ऐक्याला पोषक असे एका

विशिष्ट तऱ्हेचे मानसिक वातावरण निर्माण होऊ शकते व दुसरे म्हणजे मानवी

समूहात धर्मच समता निर्माण करू शकतो. या दोन महत्त्वाच्या कसोट्यांमुळे

सद्य:स्थितीत समता निर्माण करून चांगल्यातऱ्हेने लोकशाही नांदावयाची असेल

तर धर्माची अत्यंत आवश्यकता आहे.