३-४-१९५५ लोकशाहीचे दोन शत्रू-एक, हुकूमशाही आणि दोन, माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती - Page 478

३३२
मानवाच्या विवेकबुद्धीला केवळ बुद्धाने
आवाहन केले आहे

भगवान बुद्धाचा जन्म, बुद्धत्व प्राप्ती आणि परिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना वैशाख पौर्णिमेलाच झालेल्या, त्यामुळे हा दिवस विशेषत्वाने साजरा केला जातो. १९५५ साली ६ मे या दिवशी वैशाख पौर्णिमा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिवस सोपारा येथील बुद्ध अवशेष प्राप्त झाले त्या ठिकाणी घालविण्याचे ठरवले.

सोपारा हे पूर्वी भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर होते. अरबी ' प्रवाश्यांनी हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या प्रवास वर्णनात ' सोपारक ' चा कुबेर नगरी असा उल्लेख केला. सोपारकाजवळ नुकतेच सम्राट अशोकाचे शिलालेख संशोधकांना आढळले. सोपारकामुळेच बोरीवली जवळील कान्हेरी येथील बौद्ध विहारांची स्थापना त्याकाळी झाली असावी. सोपारा येथे भगवान बुद्धाचा दात त्यासाठी खास उभारलेल्या वास्तूमध्ये व्यवस्थित ठेवलेला उत्खनन करताना संशोधकांना आढळला होता, १९५५ ची वैशाख पौर्णिमा साजरी करण्यासाठी याच स्थळाची निवड बाबासाहेबांनी केली होती. अगदी मोजकी अशी मंडळी तेथे उपस्थित होती. त्या प्रसंगी बाबासाहेबांनी आम्रवृक्षाखाली चौथऱ्यावर आसन मांडून धर्मासंबंधी जे विचार सांगितले, त्यांचा गोषवारा येथे

देण्यात येत आहे.

आज मी तुम्हाला भगवंताच्या धर्माचे सार थोडक्यात सांगणार आहे. बुद्धाने सांगितलेला धर्म सोडला तर सर्वच धर्माची उभारणी देव आणि आत्मा या जोडीवर करण्यात आली आहे. भक्तीच्या तथाकथित पुण्याईचे गाठोडे धेऊन जीवा-शीवाची गाठ पडते, आत्मा ईशवरात विलीन होतो असा काल्पनिक आधार देव आणि आत्मा यांची बैठक पक्की करण्यासाठी दिलेला आहे. अशा कच्च्या

प्रबुद्ध भारत : ३ मे १९५८.

सदर गोषवारा श्री. व्ही. पागराऊत यांनी लिहिला आहे- कार्यकारी संपादक जनता,