३-४-१९५५ लोकशाहीचे दोन शत्रू-एक, हुकूमशाही आणि दोन, माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती - Page 479

मानवाच्या विवेकबुद्धीला केवळ बुद्धाने आवाहन केले आहे ४३९

पायावर उभारलेला हा देव-आत्म्याचा पोकळ डोलारा आहे. भवित्तचे प्रकार आपल्याला माहीत आहेतच. पूजा-अर्चा, धूप-दीप, मंत्र-तंत्र, जप-तप, कर्म-कांड या मार्गाचा अवलंब ईश्‍वर भक्तिसाठी केला जातो. पण त्याशिवाय जीव हिंसा, नरबली इत्यादी अघोरी प्रकारही आहेत. भूतेखेते प्रसन्न करण्यासाठी नाना खुळचट विधी आहेत.

सर्वाच्या मुळाशी एकच कल्पना. जीव हा पापी असल्यामुळेच जन्माला येतो. तेव्हा पापक्षालनासाठी जीवाने देह झिजवून तपत्याग साधले तरच इंश्वराची त्याच्याशी गाठ पडू शकते. अशारितीने जन्माचे सार्थक होऊन जन्म- मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. थोड्या फार फरकाने अशाच भ्रामक कल्पना आत्मा आणि इश्वर यांचा संबंध जोडण्यासाठी व त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सर्वत्र पसरवलेल्या आहेत. बौद्ध धर्मात आत्म्याला स्थान नाही तसेच ईश्वराची उचलबांगडी करण्यात आली आहे.

बौद्ध धर्म सोडून जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही धर्म घ्या. प्रत्येक

धर्मानुयायी आणि त्यांचे प्रमाण ग्रंथ तो धर्म ईश्वराने सांगितलेला आहे, असेच

प्रतिपादन करतात. ज््यांच्यामार्फत ईश्वराने धर्म सांगितला ते धर्म प्रवर्तक

ईश्वराचे प्रेषीत अथवा दूत मानले जातात. खिस्ती धर्माचे संस्थापक येशू

यहुदी धर्म प्रणेता मोझेस आणि इस्लाम धर्म प्रवर्तक मोहम्मद यांनी

प्रत्येकाने ईश्वराचे प्रेषीत म्हणजे ईश्वराचा निरोप मानवांना पोचविणारे दूत

असल्याचे सांगितले. प्रेषिताची भूमिका ईश्वर मानव संबंधात पोस्टमनपेक्षा

वेगळी असल्याचे आढळत नाही. जरी प्रेषीत हा मानवच असला तरी

ईश्वराचे आदेश तो इतर मानवांना सांगत असल्यामुळे प्रेषिताने व्यक्त केलेले

विचार, त्याच्या तोंडून निघालेले शब्द आणि वचने संशय-प्रुफ (संशयातीत) मानली

गेली. |

` अशाप्रकारे प्रेषितांनी सांगितलेल्या ईश्‍वर प्रणीत वचनांची चिकित्सा

करण्याचा मार्गच बन्द करण्यात आला. जिज्ञासा तृप्त करण्याला व

खरेखोटेपणा पडताळून पाहून ती वचने कसोटीवर लावण्याचे साधनच नाहिसे

करण्यात आले.

भगवंतानी धर्म सांगताना, मी तो सांगतो म्हणून स्वीकारा, असे कधीच

म्हटले नाही. उलट तुमच्या विचाराला पटेल तरच स्वीकारा असे म्हणून विवेक-

बुद्धिला आवाहन केले आहे. बौद्धधर्म हा चिकित्सेनंतर सांगितलेला धर्म

आहे. रोग निदानानंतर दिलेले औषध आहे. भगवंतानी प्रथम मानव जातीच्या