३-४-१९५५ लोकशाहीचे दोन शत्रू-एक, हुकूमशाही आणि दोन, माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती - Page 481

मानवाच्या विवेकबुद्धीला केवळ बुद्धाने आवाहन केले आहे ४४१

आधिभौतिक दुःख नाहीसे करण्यासाठी श्रेष्ठ अशा अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. (१) सम्यक दृष्टी, (२) सम्यक संकल्प, (३) सम्यक वाचा-चहाडी न करणे, (४) सम्यक कर्म, (५) सम्यक आजीव-वाईट मार्गाने उपजिविका न करणे. पोट भरण्यासाठी चांगलाच धंदा करणे, (६) सम्यक व्यायाम-सुविचार वाढीला लावून वाईट विचारांना थारा न देणे. वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा नाश करणे, (७) सम्यक स्मृति-शरीरातील सुखदु:खादी वेदनांचे वारंवार अवलोकन करणे, आणि (८) सम्यक समाधी-कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.

यापैकी सम्यक दृष्टीला महत्वाचे स्थान आहे. आपण जे काही करतो त्यामुळे स्वतःचाच लाभ होतो की काय हे पाहाण्याऐवजी माझे हीत साधत असताना दुसऱ्याची हानी किंवा कोणाला अपाय होतो की काय हे पाहिले तर जगातील आधिभौतिक दुःखे नाहिशी होतील.

याच बरोबर दहा पारमिता सांगितल्या आहेत. पारमिता म्हणजे आपल्याला करता येईल तेवढे. या पारमितात प्रज्ञा श्रेष्ठ आहे. प्रत्येक पारमितेला प्रज्ञेची कसोटी लागलीच पाहिजे. प्रज्ञा म्हणजे इंग्रजीत ज्याला 5५० म्हणतात ती ; प्रज्ञेचा वापर न केल्यामुळे माणूस कसा मुर्खासारखा वागतो याचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो.

एका लहानशा गावी पाद्री राहात होता: संकट ओढवले की गुडघे टेकून प्रार्थना करावी हे एकवचन त्याला माहित होते. एकदा त्या गावातील झोपड्यांना आग लागली. हा पाद्री तेथे गेला आणि सर्वांना एकत्र करून प्रार्थना करायला सुरुवात केली. अर्थातच आगीमुळे एकूणएक झोपडी जळून खाक झाली. थोडा प्रज्ञेचा वापर केला असता तर आग विझविण्यासाठी पाद्री बादली घेऊन स्वतः धावून गेला असता आणि इतरांना प्रार्थनेत न गुंतविता, तर कदाचित आगीपासून बऱ्याच झोपड्या वाचविता.

शील आणि नैष्कर्म्य यांचा परस्पर संबंध आहे. संकटयग्रस्तांना वाचविण्यासाठी पराकाष्ठा करणे याला ' दान ' पारमिता म्हणतात. जनकल्याणाची कामे उत्साहाने आणि तत्परतेने करणे याला ' वीर्य ' पारमिता म्हणतात. राग

आपोआप येतो पण ' क्षमा ' हा गुण प्रयत्नांनी मिळवावा लागतो. ' सत्य ' नसेल