डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन. आणि भाषणे ४४२
वृत्ती येते. ' अधिष्ठान ' म्हणजे तर लाचारी आणि हांजीहांजीखोर
ठेवावयाचा तसाच लहान- दृढनिश्चय. तो जसा मोठ्या कार्याच्या बाबतीत
' '
सहान बाबीतही पाहिजे. सर्वावर सारखे प्रेम करणे याला मैत्री आणि शुभ कार्यात अडथळा निर्माण न करणे याला ' उपेक्षा ' पारमिता नाव आहे.
पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि या दहा पारमिता दुःख निरोध करून दुःखाचा नाश करण्यास समर्थ आहेत. जगातील दुःख निवारण व्हावे हेच बौद्ध धर्माचे सार. आम्ही भारतीय आपल्या तत्त्वज्ञानाचे भारीच अभिमानी. परंतु गेल्या हजार वर्षात एकही तत्त्वज्ञ अथवा तत्त्वचिंतक निर्माण झाला नाही. ` तात्विक विचार करून एखादा सिद्धांत मांडण्यासाठी जी मनोभूमिका विद्वानांची असावयाला हवी होती ती न राहिल्याने विद्वान विचारविनिमयाला आणि
'देवाणघेवाणाला पारखे झाले. त्यामुळे विद्वानांची बुद्धि कप्प्याकप्प्यात बंदिस्त होऊन कुंठीत झाली. त्यामुळे सत्यशोधन आणि सत्यग्रहण करण्याचे कार्य मागे पडून पंडितांऐवजी पुस्तकी पढीतांचा वर्ग निर्माण झाला.
ज्ञानाची किल्ली,
सांगेन एकच बोली
ही कल्पना निमाली
भाराभर ग्रंथ नुसते वाचून काय उपयोग? गाढवाच्या पाठीवर ग्रंथ लादण्यापासून गाढवाला जेवढा लाभ तेवढाच लाभ फार तर अशा वाचनाने होऊ शकेल. ग्रंथ वाचून रसग्रहण करण्याची शक्ती पाहिजे, नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजेत, सिद्धांत परिपोष करता आला पाहिजे.
_ आज कोणताही विषय घ्या किंवा शास्त्र घ्या. साहित्य, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र,
आरोग्यशास्त्र, विज्ञानशास्त्र, राजनीती, युद्धनीती इत्यादी कोणतीही ज्ञानाची
शाखा घ्या. भारतीय म्हणून जे काही आहे ते पूर्णतेला पोचलेले नाही. तसे ज्ञान कधीही पूर्णत्वाला पोचू शकत नसते. आज परिपूर्ण वाटणारे ज्ञानाचे अंग किंवा शाखा भविष्य कालात अपूर्ण वाटणारच कारण दिवसागणिक त्यात वाढ होत असते, भर पडत असते. माझ्या म्हणण्याचा आशय असा की, या देशातील
विद्वानांनी, पंडितांनी, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, उज्जयनी, अवन्ती या जागतिक किर्तीच्या त्या काळातील विद्यापिठातील आचार्यानी जो ज्ञानसंचय केला त्यात गेल्या शेकडो वर्षात यत्किचितही भर तर पडलीच नाही पण '' जे जे आपणांसी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करूनी सोडावे, सकळ जन " याच्या उलट वागणूक केल्यामुळे मुळात असलेले ज्ञानही लोप पावले. गुरूने