मानवाच्या विवेकबुद्धीला केवळ बुद्धाने आवाहन केले आहे ४४३
शिष्याला विद्या देताना हातचे एक राखून ठेवावे. गुरूला शंभर उपचार माहीत असतील तर नव्याण्णव चीजा चेल्याला देऊन एक गुरूकिल्ली आपल्या हाती ठेवावी. असा पायंडा पडल्यामुळे ज्ञानाचा ऱ्हास होऊन त्याचे विकृत स्वरूप तेवढे शिल्लक उरले.
माणसाला निर्वाणपद प्राप्त करता आले पाहिजे. धम्मपदात ' निब्बाण्णं परम सुखं ' असे म्हटले आहे. गडगंज संपत्ती जवळ आहे म्हणून सुख लाभत ` नसते. नुसत्या पांडित्याने माणूस सुखी राहत नाही. तो दुःखी नसतो. पण असुखी असतो कारण अतिलोभ, खून, चोरी, परदारागमन इत्यादी विकार जन्मजात आलेले असताना विकारावर ताबा ठेवता आला पाहिजे. _
भगवंत म्हणतात मानव हा जळता अग्नी आहे. विकार हे या अग्नीमुळे पाण्यासारखे उकळत असतात. अग्नी चेतवता येतो किंवा शांत करता येतो, विकार नाहिसे करता येतील. परंतु समूळ उपटून टाकता येत नाहीत. अग्नीचा उपयोग करून घेण्यासाठी तो जसा मंद ठेवून अन्न शिजवून घ्यावे त्याप्रमाणे मानवाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी मधली स्थिती निर्वाण ही होय. त्यामुळे दश विकारांच्या आधीन न जाता मानव तकशुद्ध विचारसरणी ठेवून समाज उपयोगी कार्य करू शकतो.
ज्यांनी धर्मतत्त्वाबद्दल चर्चा केली त्यांनी त्याचे एवढे. गुपीत राखले की, भगवंतांना सांगावे लागले. स्त्रिया, खोटी धर्ममते आणि भटा-भिक्षुकांच्या पोथ्या.
या तीनच गोष्टी गुप्तता पाळतात. तरी देखील
श्रुतीविभिन्ताः स्मृतिविंभिन्ताः
धर्मस्व तत्वं नि हितं गुहायां
महांजनो येन गतस्य पंथ:
' पीछेसे आई आगे चलाई ' अशी अवस्था धर्मतत्त्वांची करण्यात आली. श्रुती
वेगळे सांगतात, स्मृत्या त्याही काही निराळाच उपदेश करतात. धर्माची तत्त्वे
फारच गहन आणि गूढ ! मग काय करायचे तर चार मोठी माणसे ज्या मार्गाने
जात असतील तो पंथ स्वीकारा. भगवंताने सांगितले की, मी सांगतो. म्हणून
नव्हे तर तुमच्या बुद्धिला, विवेकाला पटत असेल तर हा धर्ममार्ग
स्वीकारा. एकीकडे आंधळेपणाने चार लोकांच्या मार्गाने आपण चला असा
आदेश तर दुसरीकडे बुद्धिला आवाहन. किती मोठे अंतर आहे दोन
विचारसरणीत.