३-४-१९५५ लोकशाहीचे दोन शत्रू-एक, हुकूमशाही आणि दोन, माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती - Page 485

मानवाच्या विवेकबुद्धीला केवळ बुद्धाने आवाहन केले आहे ४४५

| 'होतो. त्याप्रमाणे चाललेल्या जगरहाटीला पुनर्निर्मिती म्हणतात. परंतु जमीन,

पाणी, वारा, खत यांचा जोड परिणाम होऊन मूळ आंब्याला जसे मधूर फळ

॥ै येईल तसेच दुसऱ्या आंब्याला. येऊ शकेल असे नाही. कदाचित चांगला

परिणाम झाला तर चांगले फळ येईल, वाईट झाला तर वाईट येईल. ' शुद्ध

बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, ' म्हणूनच एका प्रांतात विशेष फळ-फुल

1 झाडांची वाढ होते. इतरत्र ते जगू देखील शकत नाहीत. जसे चहा-कॉफी

: आसाम, निलगीरीत होते. नारळ समुद्र किनाऱ्यावरच वाढतात. संत्री

चांगली मध्य-प्रदेशात नागपुरलाच होतात. मसाल्यासाठी जावा बेट प्रसिद्ध

आहे. हापूस आंबा रत्नागिरी जिल्ह्यातलाच चवीला आणि रसाला

चांगला. एकूण पुननिर्मितीच्या कार्यालाच पुनर्जन्म असे म्हटले आहे.

परंतु पुनर्जन्म शब्दाचा आधार घेऊन त्याबरोबर आत्मा बौद्ध तत्त्वज्ञानाला मान्य आहे असा गैरसमज पसरविला जात आहे. पण तो गैरसमजच

आहे. |

' कर्म ' याचा अर्थ ब्राह्मण व बौद्ध धर्म वेगवेगळा करतात. कर्म ही अत्यंत

महत्त्वाची गोष्ट आहे. हा जगाचा व्यवहार कसा काय चालला आहे ? ब्राह्मण

ग्रंथ म्हणतात नियंता चालवितो. त्याला ब्रह्माही म्हणतात. इतर धर्मही

ईश्वर, अल्ला, गॉड या नावानी त्याच कल्पनेला पुष्टी देतात. बौद्धधर्मात

ईश्‍वर नाही. बौद्धधर्मानुसार जगाचे व्यवहार दरएकाच्या कर्माने

चालतात. यामुळे बौद्धधर्मनि मनुष्यमात्रावर जबाबदारी टाकली आहे. केले

तसे भोगावे लागेल अशी ताकीद दिली. याला कर्मविपाक म्हणतात.

कर्मविपाक म्हणजे आमच्या क्रियेपासून निर्माण होणारी फळे. कर्म

म्हणजे पूर्वसंचीत, पूर्वजन्मी साठविलेले पापपुण्याचे गाठोडे असा अर्थ बौद्ध

तत्त्वज्ञानात नाही. काही कर्म असे असते की, त्याचा परिणाम ताबडतोब भोगावा |

लागत नाही. त्या कर्माचा, क्रियेचा परिणाम कालांतराने होतो. परंतु

जन्मांतराने नव्हे. कारण पुनर्जन्मच नाही.

यामुळे बौद्ध धर्माने माणसाला स्वत:च्या सद्गुणांची वाढ करण्याला वाव ठेवला

आहे. मानवाला स्वत:च्या प्रगतिसाठी, उन्नतिसाठी स्वतःच झटावे लागेल असा

आदेश दिला आहे. ' माझ्या कपाळी हे लिहिले आहे. हे विधीलिखीत

आहे. ब्रह्माची रेघ आहे ' म्हणून हताश न होता, निराश न होता स्वतःच्या

उद्धाराचा राजमार्ग दाखविला आहे. संचित हे एक माणसाला निष्क्रिय करणारे,

धैर्य खचवणारे थोतांड आहे.