३२३३
बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात जमीन अस्मानाचं अंतर आहे
भारतीय बौद्धजन समितीच्या विद्यमाने भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव
. श्री. मंगलदास पक्वासा, माजी राज्यपाल, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली
` डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ८ मे १९५५
_ रोजी सायंकाळी ७ वाजता, नरे पार्क, सेंट्रल रेल्वे वर्क्स शॉप समोर परळ, मुंबई
नं, १२ येथे मोठ्या प्रमाणात साजरा करावयाचा आहे. मिरवणुकीसाठी तीन
` मार्ग आखलेले आहेत, त्याप्रमाणे ठिकठिकाणच्या लोकांनी या मिरवणुकीत भाग
घेण्याची कृपा करावी, मिरवणुकीच्या लोकांनी ४-३० वाजता मिरवणुकीस
सुरूवात करून सातं वाजेपर्यंत नरे पार्क मैदानावर येण्याची खबरदारी
घ्यावी. इतर ठिकाणच्या लोकांनी परस्पर नरे पार्क मैदानावर संध्याकाळी
७ वाजेपर्यंत यावे, असे समितीच्या सचिवाने, जनता, दिनांक ७ मे १९५५ च्या
अंकात प्रसिद्ध केले होते.
यानुसार मुंबई नरे पाक येथे दिनांक ८ मे १९५५ रोजी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला ऐंशी हजार
जनसमुदाय हजर होता. त्याला संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर
म्हणाले,
अध्यक्ष महाराज, बंधु आणि भगिनींनो,
आज या ठिकाणी माझे येणे झाले आहे, ते एका दृष्टीने आगंतुक आहे. या
सभेला मी हजर राहीन, अशी अपेक्षा नव्हती, आज, उद्या, परवा दिल्लीला
जाणार अशा अपेक्षेत मी होतो. पण कर्मधर्म संयोगाने मला १२ तारखेपर्यंत
गाडीचे तिकीट न मिळाल्यामुळे राहावं लागलं. त्या संधीचा फायदा घेऊन मी
या सभेला हजर राहावं म्हणून मला आग्रह करण्यात आला. त्यांच्या विनंतीला
मान देऊन मी येथे उपस्थित झालो.
माजी गव्हर्नर अध्यक्ष असताना मला सभेला येण्याचे कारण नव्हते. माझ्या
येण्याने सभेला महत्त्व येईल, असे वाटत नव्हते. परंतु लोकांचे म्हणणे धुडकावून
लावणे योग्य नाही. या ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय पाहून मला मोठा
आनंद वाटतो. तुम्हा सर्व लोकांना चाळीचाळीचा अभिमान. तो माझगावच्या
जनता : १४ मे १९५५.