६-५-१९५५ बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात जमीन अस्मानाचे अंतर आहे - Page 488

४४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अड्थात राहणारा, मी भायखळ्याच्या पिवळ्या चाळीत राहणारा ! जो कार्यक्रम व्हावयाचा असेल तो माझ्या अङ्कयात व्हावा ही इच्छा. आपापल्या गल्लीत कसला तरी समारंभ साजरा करतात. ही रुढी टाकून एकमताने हा समारंभ साजरा केलात याबद्दल अभिनंदन. तुम्ही नवीन धडा घातलेला आहे. तो दरवर्षी अशारीतीने चालवीत राहाल, अशी उमेद आहे.

मला अन्य गोष्टींचा आज समाचार घ्यावयाचा आहे. आज एक महिना मी मुंबईत आहे. मुंबईची वर्तमानपत्रे मी वाचतो. कोणीतरी माझ्याकडे कटिंगही पाठवित असतो. बौद्ध धर्म स्वीकारण्याबद्दल अनेक लोकांची मते वाचायला मिळतात. किमानपक्षी सर्व वर्तमानपत्रातून टीका येते. अस्पृश्य लोक या कार्याला उद्युक्त झालेले आहेत, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना आंबेडकर बहकविण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही धर्म स्वीकारल्यास तुमचे नुकसान होईल, डॉ. आंबेडकर वेडा आहे, त्यांच्या मागे लागू नका, तुम्ही खड्यात पडाल, अशी ते टीका करतात. सार्वजनिक कार्यात टीका करण्याचा अधिकार सर्वाना आहे. याचा मला खेद वाटतो अशातला भाग नाही. माझा जन्म दुसऱ्याची टीका सहन करण्यात गेला. ज्याप्रमाणे लहान पोराला त्याची आई दृष्ट लागू नये म्हणून काजळ लावते त्याप्रमाणे हे लोक मला नेहमी काजळ लावतात. या कृत्याचे मला विशेष काही वाटत नाही.

आपल्यातील पुष्कळसे लोक अज्ञानी व काही सज्ञानी आहेत. त्यांच्यावर वर्तमानपत्रातल्या लिखाणाचा परिणाम होत असेल. त्या लिखाणाचा परामर्ष घेणे अगत्याचे आहे. तथापि, मला एक गोष्ट सांगावयाची आहे की टीका करण्याचा हकक कोणाचा ? कोणी कोणावर टीका करायची? ज्याला सहानुभूती आहे, त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो. संरक्षण करणारालाच टीका करण्याचा अधिकार आहे, जीव घेणाराला-मारणाराला टीका करण्याचा अधिकार नाही. |

भगवान बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त शिकारी होता. त्याला शिकार करण्याचा नाद, तिरकमठा घेऊन पक्षी मारायचा. भगवान बुद्ध अहिंसेचा भक्त. देवदत्ताचे करणे भगवंताला नापसंत होते. ते म्हणत ' निरपराधी शवापदांचा जीव घेऊ नका.' त्यांना इतर लोक म्हणत, तू नामर्द आहेस, तू क्षत्रिय नाहीस. एकदा देवदत्तौने शिकारीला जाण्याचे ठरविले. तेव्हा बुद्धाने सांगितले ' मी तुमच्या बरोबर शिकारीला येईन, पण बाजूला बसेन, तुम्ही