६-५-१९५५ बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात जमीन अस्मानाचे अंतर आहे - Page 489

बुद्ध धर्म व हिंदु धर्म यात जमीन अरमानाचं अंतर आहे ४४९

शिकार करा. शेवटी ते शिकारीला गेले. एका झाडाखाली भगवान बुद्ध बसले. त्यानंतर देवदत्त तेथून निघून गेला. काही अवकाशानंतर एक पक्षी आकाशात्रून खाली पडला. तिथे भगवान बुद्ध बसले होते. तो पक्षी भगवंताने पाहिला. तो पक्षी तीर लागून पडला होता. त्यांनी त्याच्या ' छातीतील तीर काढला. त्याला पाणी पाजले. त्याला छातीजवळ घेऊन ऊब दिली. त्याला सावध केले. देवदत्त पक्षाचा शोध घेत आला. त्याने बुद्धाला विचारले, मी एका पक्षाला उडत असताना बाण मारला. तो कोठे पडला तुला माहीत आहे काय ? तो तुझ्या भवती पडला असेल. भगवंताने सांगितले : पक्षी माझ्याजवळ आहे. त्याच्या पोटात बाण होता तो काढून

टाकला. त्याची जखम धुतली. त्याला उब देऊन सावध केले.

देवदत्त म्हणाला, हा पक्षी माझा आहे. त्याबद्दल बराच वाद

झाला. देवदत्ताने सांगितले शिकारीचा नियम असा आहे की ज्याने जनावराला

मारले तो त्याचा धनी. मी याला मारले आहे, मी याचा धनी. बुद्धाने सांगितले,

'' जो मरणासन्न जीवाचे रक्षण करील तोच धनी, मारणारा धनी नव्हे ” उभयतांचे

पुष्कळ वेळ भांडण झाले. ते म्हणाले : आपण हे पंचायतीपुढे मांडू. प्रत्येकाने

आपापला प्रश्‍न पंचायतीसमोर मांडला. पंचायतीने बुद्धाच्यातफं निकाल

दिला. जो रक्षण करतो. तो धनी, हीच नीती खरी आहे.

म्हणून मला वर्तमानपत्रकर्त्यांना असे विचारावयाचे आहे की तुम्ही आमचे

रक्षणकर्ते की आमचे विनाशकर्ते ? तुम्ही आहात तरी कोण ? हजारो वर्षे

आम्ही तुमच्या समाजात वावरत आलो. कोणीतरी पुढे येऊन सांगावे की

अस्पृश्यांसाठी या गोष्टी केल्या. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी करंगळीसुद्धा

वरती केली नाही त्यांना टीका करण्याचा काय अधिकार ? ह्या लोकांना माझे

असे सांगणे आहे की तुम्ही तोंड गप्प करून बसा. आम्हाला खड्यात पडायचे .

असेल तर पडू. तुम्ही इतके दिवस आम्हाला खड्यात टाकलात, आता ते

स्वातंत्र्य आम्हाला द्या. खड्यात पडण्याचा अधिकार, चुका करण्याचा अधिकार

आम्हाला द्या. तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. तुम्ही अस्पृश्यांच्या

पोरांना विलायतेला पाठविलं आहे काय ? त्यांना ह्या ज्या स्कॉलरशिप्स मिळत

आहेत त्या मी मिळविल्या आहेत. ह्या पडीत जमिनी तुम्ही स्वखुशीने दिल्या

आहेत काय ? आम्ही आमच्या पायावर उभे राहू. हिंदुंनी आमच्यासाठी काय

केले ? त्यांनी एकच सुधारणा केली. ती म्हणजे रेल्वेमध्ये जाताना ते आमच्या

डब्यामध्ये बसतात. तेही माहीत नसतं म्हणून. (हंशा)