६-५-१९५५ बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात जमीन अस्मानाचे अंतर आहे - Page 490

४५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबाबत कायदे होते. माझी

आई सांगत असे, महार लोकांना कपडा विकत घ्यावयाचा असेल तर तो लांबून

पाहावयाचा. त्याचे दाम काय ते विचारावयाचे. दुकानदार दुकानातून कपडा हालवीत असे. त्या माणसाने कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचे. त्या कपड्यावर शिंपडावयाचे, नवीन कपडा चिखलात घासावयाचा. कारण त्यांनी नवीन कपडा घालू नये ! फाटलेला कपडा त्यांनी वापरावयाचा. माती मध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये दोन बोटे घालून त्याचे दोन भाग करावयाचे. नंतर महाराने पैसे ठेवावयाचे व कपडे घेऊन जावयाचे. आम्ही लोक लंगोट्या लावतो. ती पेशव्यांचीच आज्ञा होती. ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी निऱ्या घालायच्या. ब्राह्मणेतरांनी फक्त मागच्या बाजूने निऱ्या घालायच्या. भंडारी लोकांनी ढुंगणाला रूमाल लावून त्याचा मोठा भाग ढुंगणाभोवती गुंडाळावयाचा असा हा नियम होता

इंग्रज सरकार आल्याने मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. सोनारावर पेशव्यांचा फार डोळा होता. सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण. पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण. सोनार ब्राह्मणासारखी धोतरे नेसत. त्यांनी अशी धोतरे नेसू नये, भ्रष्टाकार झाला, म्हणून सर्व पत्रामध्ये खळबळ उडाली. ब्रिटिशांनी धर्म बुडविला, असे ओरडू लागले. साहेब बावरले, पेशव्याची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली. पेशवे म्हणाले, आमच्या पूर्वीच्या प्रजाजनावर निर्बध होता. ते तुमच्या राज्यात आल्याने कासोटी घालतात. ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळेला बालक होती. बाळकेश्वराला महाजन लोक होते. मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली. त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली. सोनार कासोटा घालीत होते. सोनाराने कसोटा घालावयाचा नाही. पंचानी ५० रुपये दंड सांगितला. आता लोक कोट-पाटलोन घालतात.

यांच्यात गाडीत बसण्याखेरीज दुसरा काही फरक झाला नाही. मग हे लोक टोका का करतात ? हे आमचे हितचिंतक ? ते म्हणतात की तुम्ही बौद्धधर्मीय झाला तर स्कॉलरशिप्स जातील. पण गिरणीत जाणाऱ्यांना स्कॉलरशिप्सचं काय महत्त्व कळणार. ह्याचे महत्त्व जे शाळेत जातात त्यांना. - ह्या पत्रकारांना असे कसे वाटते ? म्हणे स्कॉलरशिप्स मिळणार नाही. पण त्यासाठी मी जिवंत आहे ना ! (टाळया) मी मरेन तेव्हा काय व्हायचं असेल ते होईल. मी जिवंत आहे तोपर्यंत भिण्याचे कारण नाही. शीख अस्पृश्यांना स्कॉलरशिप्स मिळते. धर्मावर स्कॉलरशिप्स अवलंबून नाहीत. त्या दैन्यावस्थेवर अवलंबून