६-५-१९५५ बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात जमीन अस्मानाचे अंतर आहे - Page 491

बुद्ध धर्म व हिंदु धर्म यात जमीन अस्मानाचं अंतर आहे ४५१ आहेत. तुम्ही दिली ती किती दिवस दिली. ' यावच्चंद्रदिवाकरो ' असे तर नाही ना ? चंद्र-सूर्य आहे तोवर स्कॉलरशिप्स मिळेल काय ? हे एक वर्षाचं, दोन वर्षाचं किंवा चार वर्षाचं. कुंकू लावायचं आहे तर नवरा जगेल किंवा नाही याचा भरवसा पाहिजे. आता सरकारी नोकरी किती वर्षे राहील. मी विधान केल्यानंतर पाच महिन्यांनी मुन्शीसाहेबांच्या पोटात गोळा उभा राहिला. त्यांनी मुसलमानांच्या सवलती काढून घेतल्या. खिश्चन होते त्यांनाही सवलती दिलेल्या होत्या. पण त्यांचा एक मनुष्य होता. त्यांना गव्हर्नर व्हावयाचे होते. त्यांनी मला काही नको म्हणून सांगितले. मग माझ्याकडे कागद आला. मी तो फाडून टाकला. दुसरे सोन्याची सरी घालतात म्हणून आम्ही काय फास लावायचा ? मी लिहून दिले नाही म्हणून आजपर्यंत आम्ही ते ठेवलं, पण

आज त्याचा काही उपयोग नाही.

आमच्यातला एक मनुष्य इंजिनियर होण्याच्या लायकीचा आहे. पण त्याला अजून इंजिनियर करण्यात आले नाही. आमचा मुख्यमंत्रीदेखील त्यात सामील! राजा जर प्रजाजनाला मारू लागला तर मग त्यांनी जावं कोणाकडे ? ' भूसके लडू जिसने खाया वह फसा, न खाया वह भी फसा. '

मला शिकलेल्या लोकांना सांगावयाचे आहे. महार लोक काय करीत होते ? रात्री उठून तराळला हिंडायचे. सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तो खावयाचा फलटण गावामध्ये महार होते. त्यांना २४ बिघे जमीन होती. तिथे एक देऊळ होते. त्यात अन्नछत्र होत असे. आपले एक मिनिस्टर होते. एक गाडी लाडू जिलेबी, चपाती वगैरे या छत्रालयातून देण्यात येत असे. महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन

जावयाचे. एवढे मिळाल्यानंतर महारांना जमीन मिळवायची काय गरज ! काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर हे महार म्हणाले,

': आमची एवढी जमीन होती, ती मराठ्यांनी घेतली . ” देवळातील उष्टे मिळायचे. अशी त्यांची अवस्था होती.

जळगावाला श्राद्ध झालं तर महार भिकारङ्यासारखे कचऱ्यावर बसायचे. हा खिस्ताव झाला, तोंडचा घास काढला याने, याचं कसं बरं होइल, असे लोक मला म्हणत. माझा एक ब्राह्मण विरोधी होता. तो दरदिवशी त्रैराशिक मांडायचा. ढोराचे मांस, शिंगे, कातडी, हाडं यांची दोन-चार हजाराची किमत