६-५-१९५५ बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात जमीन अस्मानाचे अंतर आहे - Page 493

बुद्ध धर्म व हिंदु धर्म यात जमीन अस्मानाचं अंतर आहे ४५३

हे लोक हिंदू धर्मात व बौद्ध धर्मात फरक नाही, असे म्हणतात. मग त्यातली चांगली वैरण आहे ती का खात नाहीत? आम्हाला का खाऊ देत नाहीत ? बौद्ध धर्म वाईट आहे असे कोणी सांगू नये. हा वाईट धर्म आहे असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा नाही. साऱ्या हिंदुस्थान देशाने बौद्ध धर्म स्वीकारावा. बुद्ध धर्म व हिंदु धर्म एकच आहे, ही गोष्ट खोटी आहे. त्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. यासाठी मी ५-७ मुद्दे सांगणार आहे. हिंदू धर्मात खंडोगणती देव आहेत. तेहतीस कोटी देव आहेत. त्यांचे देवाशिवाय चालत नाही. सृष्टी कशी उत्पन्न झाली ? कोणी सांगतं कुणीतरी अंड टाकलं, पण ते कुणी टाकलं हे माहीत नाही. भगवंताने सांगितले सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगता यावयाचे नाही. हा प्रश्‍न महत्त्वाचा नाही. ती कशापासून तरी केली किवा काही अस्तित्वात नसताना केली, हे दोनच पर्याय असू शकतात, तिसरा पर्याय नाही. |

जगामध्ये काही नसताना सृष्टी निर्माण केली ही गोष्ट दुरापास्त. ईश्वर हा सृष्टीचा निर्माण कर्ता नव्हता. हिंदू धर्मात ईश्वर आहे, बुद्ध धर्मात ईश्वर नाही, हा मुख्य भेद आहे. बुद्ध धर्मात आत्मा नाही, हिंदू धर्मात आत्मा आहे. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले आत्मा कसा आहे ? ' आत्मा वस्तु अशी आहे की लोखंडाने ज्याला कापले तरी घाव पडत नाही ' असे उत्तर मिळाले. लोखंड हे लोखंडाने कापता येते. आत्मा ही वस्तु अशी आहे की लोखंडाने घाव करता येत नाही ! असे असू शकेल काय ? त्याचप्रमाणे आत्मा जळू शकत नाही, असे श्रीकृष्णाने उत्तर दिले. त्याचे असे सांगणे आहे की आत्म्याला क्लेश नाही. ताप येतो, खोकला येतो, पड़सं होतं, हे सर्व थोतांड आहे. याच्यात सत्य नाही. भगवंताने एकदा विचारले आत्मा किती मोठा आहे? त्याचा साईज काय आहे, लांबी-रूंदी काय आहे ? हा आत्मा आहे तरी कोठे ? असे याज्ञवल्क्य याला हजारो प्रश्‍न विचारले. ब्राह्मणांनी ग्रंथ रचून ब्रह्म आहे, हे लोकांच्या घशात कोंबलं आहे.

तिसरी गोष्ट, हिंदू चातुर्वर्ण्य मानतात ; पण बुद्ध धर्मात चातुर्वर्ण्य व जातीभेद नाही. एकदा लोहित ब्राह्मणाने भगवंताला प्रश्‍न केला की तू शूद्रांना विद्या का शिकवितोस ! ' जो पात्र असेल त्याला विद्या, अपात्र असेल त्यांना विद्या नाही. ' ब्राह्मणी धर्म असा नाही. एकदा बुद्धाने आईला प्रश्‍न विचारला, संकट समयी मारणं हे कर्तव्य कसं ? बौद्ध धर्मात असे नाही. वैश्यांनी दगाबाजी करावयाची हे काय म्हणून ? बौद्ध धर्मात जातीभेद, असमानता, चातुर्वर्ण्य नाही. जातीभेद नष्ट करण्यासंबंधी ठराव करण्यात येतात. पणते