बुद्ध धर्म व हिंदु धर्म यात जमीन अस्मानाचं अंतर आहे ४५५८ काढण्याला देखील ज्ञान लागतं. ' तुला ज्ञान आहे काय ? तुला ज्ञान नाही तर मग तुला शंका काढण्याचा अधिकार काय ? ' असे गुरुने उत्तर दिले, आमच्या विद्वानांना याचं काय ज्ञान.
भगवान बुद्धाने आनंदाला हेच सांगितले. मी सांगतो म्हणून हा धर्म तुम्ही घेऊ नका. व्यवहारात हा घर्म चालू शकेल असं तुम्हाला वाटलं तरच घ्या. तुमच्या बुद्धिला पटला तरच हा धर्म माना. एकजीवाने, अक चित्ताने आपणाला गेलं पाहिजे. याच मार्गाने आपला उद्धार होईल.
बौद्ध धर्मामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. या धर्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही. आपले मुख्य कार्य प्रचार करण्याचे, आम्हाला लोकांना बुद्धिस्ट करून घ्यावयाचे आहे. हेच कर्तव्य होय. दोन-चार दिवसापूर्वी आम्ही एक संस्था स्थापून रजिस्टर केली आहे. या संस्थेचे सभासद व्हावे, अशी विनंती आहे. वरच्या वर्गाचे लोक पैसे देतील अशी अपेक्षा नाही. कार्याला सुरवात तर झाली पाहिजे. तरी सर्वानी समितीचा मेंबर व्हायला पाहिजे. यासाठी एक रुपया भरावा लागेल. आपल्याला मंदिरे बांधावी लागतील. तेथे स्त्रिया-पुरूष जाऊन भक्तिभावाने पूजा करतील. आपल्यात उपटसुंभ लोक फार आहेत. तो प्रकार मी इथं होऊ देणार नाही. पावती घेतल्याशिवाय कोणी पैसे देवू नयेत. श्री. बी.'एस. गायकवाड, श्री. का. वि. सवादकर, श्री. बाळू कबीर हे तुमच्याकडून फॉर्म भरून घेऊन पावती देतील.
७ 6 ७