१२-१२-१९५५ विद्या, प्रज्ञा करुणा, शील वमेत्री या पंचतत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे - Page 496

३३४

विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या

पंचतत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य
बनविले पाहिजे

औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधि मंडळाच्या विद्यमाने दि. १२ डिसेंबर १९५५ रोजी सभा भरविण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रथम श्री. शंकरराव देव यांच्या दि. ७ डिसेंबर रोजी महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानातील एका विधानाचा परामर्श घेतला. श्री. शंकरराव देव यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, '' महाविद्यालयाला केवळ ' मिलिद ' हे नाव देऊन भागणार नाही, तर अक्रोधाने क्रोध जिकणाऱ्या बौद्ध शिकवणुकीचाच पुरस्कार तिथे झाला तर मिलिंद हे नाव सार्थ होणार आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. देवांच्या टीकेसंबंधी बोलताना म्हणाले,

मिलिंद हा एक ग्रीक होता. त्याला आपल्या बिद्वतेबद्दल घमेंड होती की, ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाहीत. त्याने जगाला आव्हानही दिले होते. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्खुबरोबर वाद करावा. पण त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. मिलिद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता. तो काही तत्त्वज्ञानी नव्हता किंवा जाडा विद्वानही नव्हता. त्याला राप्ज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत होते. पण अशा मिलिदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. महाप्रयासाने “ नागसेन “ भिक्खु ला तयार केलं गेलं. मिलिंदाचं चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे, असा त्याने निश्‍चय केला, मग त्यात यश येवो किंवा अपयश येवो.

नागसेन हा ब्राह्मण होता. वयाच्या सातव्या वर्षी त्यानं आपल्या आईबापाचं घर सोडलं होतं. अशा या नागसेनाने भिक्खु लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन मिलिंदाचा पराजय झाला. त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. त्या पुस्तकाला पाली भाषेत ' मिलिंद पन्ह ' असं नाव आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर

जनता : १७ डिसेंबर १९५५.