विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या . . . . चारित्र्य बनविले पाहिजे ४५७
' मिलिद प्रश्न ' असं आहे. या पुस्तकाचं शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावं अशी माझी इच्छा आहे. त्यात शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत हे दिलेले आहे. म्हणून मी वं माझ्या सोसायटीने ह्या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिलं व जागेला ' नागसेन वन ' असं नाव दिलं. मिलिंद हरला व बौद्ध झाला, म्हणून मी हे नाव दिलेलं नाही. मी जे ह्या कॉलेजला नाव दिलेले आहे ते आदर्शभूत असंच आहे, असं माझं मत आहे.
शिक्षणसंस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे हे अत्यंत अनुचित आहे.
बौद्धधर्माशी संलग्न झालेले ' मिलिंद ' हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की, विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे. हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धानीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना [बुद्धाचे ] [अथवा ] त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे.
मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात २,९०० व या कॉलेजात ६०० विद्यार्थी आहेत. मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे.
श्री. शंकरराव देवांनी या कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या
धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला आहे. तो असा; ' अक्रोधेन जेयत्
क्रोधं ! ' मनुष्याने क्रोध हा अक्रोधाने जिंकावा, असं ते म्हणाले. कारण मी
अतिशय क्रोधी आहे, हे जगाला चांगले परिचित आहे. श्री देव म्हणतात,
माणसाने क्रोध गिळला पाहिजे. मला यावरून वाटते की देवांचं वाचन अपुरं
आहे. त्यांनी चांगलं वाचन केलेलं दिसत नाही (टाळया). भगवान बुद्धानी
' राग ' ` (19०7) यावर व्याख्यान दिलं आहे. ते जर देवांनी वाचलं असतं
तर त्यांनी असले उद्गार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर
त्याच्यावर टीका करू नये. राग दोन प्रकारचे असतात. (१) द्वेषमूलक,
(२) प्रेममूलक. जो कसाई असतो तो कुऱ्हाड घेऊन जातो. त्याचा राग हा
द्वेषमूलक असतो. आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय
म्हणेल ? तिचा राग असतो तो प्रेममूलक असतो. मुलाने सदाचारी व्हावं
म्हणून आई मुलाला मारीत असते. माझा रागही प्रेममूलक आहे. तुम्ही
समतेनं वागावं म्हणून मी राजकारणात शिव्या देतो. माझ्यावर टोका करणाऱ्या
लोकांची मी मुळीच पर्वा करणार नाही. (टाळया) मी सगळं केलं ते झगडा करून
केलं आहे.