भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे ४६५
जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात राहायला येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या जीवन- स्थितीत सुधारणा होणार नाही. आमच्या खेड्यातून.राहाणाऱ्या या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी राहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी त्यांना कुत्र्यासारखे वागवले जाते, ज्या ठिकाणी त्यांचा पदोपदी मानभंग होतो, जेथे त्यांना अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे ! खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडीत जमीन असेल ती ताब्यात घेऊन त्यावर मालकी दाखवावी. जर कोणी जमीन ताब्यात घेताना अडवले तर त्यांना स्पष्ट सांगावे की, आम्ही जमीन सोडणार नाही, परंतु योग्य तो शेतसारा सरकारला यावयाला तयार आहोत आणि नवीन गावे बसवून स्वाभिमानपूर्ण माणुसकीचे जीवन जगावे. तेथे नवा समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कोणी अस्पृश्य म्हणून अपमानास्पद वागणूक देणार नाही. माझी प्रकृती ठीक होताच मी स्वतः अस्पृश्यांनी पडीत जमिनी ताब्यात घेण्याची चळवळ चालविणार आहे.
आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे, हे सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य आहे. बड्या हुझ्यांच्या जागी गेल्यावर या सुशिक्षितांना आपल्याच अशिक्षित
बांधवांचा विसर पडतो. याचे कारण, त्यांच्यात स्वत:च्या समाजाविषयी आपुलकीची भावना नाही, त्यांच्या ठिकाणी आपल्या बांधवांबद्दल कळकळ व तळमळ नाही, हे होय. धर्मभावनेचा अभाव हेही एक कारण आहे. जर त्यांनी आपल्या या असंख्य बांधवांकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा ऱ्हास होईल.
दुसऱ्या कोणत्याही धर्मापेक्षा बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे. माझी इच्छा आहे की, तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर बौद्ध धर्माचा या वर्षी स्वीकार करावा. मी या बाबतीत तुमच्यावर सक्ती करणार नाही. हा तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. परंतु माझ्या . बौद्ध धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहाणार नाही. आपण सर्व बौद्ध झाल्यानंतर राखीव जागेचे अधिकार राहाणार नाहीत. त्याचबरोबर आपण हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, विधीमंडळे-लोकसभा यातील राखीव जागांची मुदत घटनेप्रमाणे फक्त दहाच वर्षांची आहे. ती मुदत लौकरच संपेल. आयुष्यभर ` राखीव जागा थोड्याच राहाणार आहेत. शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावर