१८-३-१९५६ माकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्व आहे - Page 506

४६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अवलंबून राहावे लागेल. शेवटी आपल्याला आपल्याच पायावर उभे राहिले पाहिजे. राखीव जागांच्या पांगुळगाङ्याच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही.

बौद्ध झाल्याबरोबर मला तुमचे नेतृत्व करता येणार नाही आणि मला फेडरेशनमध्येही रांहाता येणार नाही. यासाठी माझी अशी हार्दिक इच्छा आहे की, दलित वर्गीयांपैकी कोणी अशा व्यक्तिने पुढाकार घ्यावा की जी व्यक्ती माझ्या ऐवजी आपले नेतृत्व करू शकेल. नाहीतर एक खांबाच्या आधारावर असलेल्या तंबूसारखी ही संघटना कोसळून पडेल.

बौद्ध झाल्यावर राजकारण मात्र सोडणार नाही. फक्त शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या तिकिटावर उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार नाही. मी आपल्या स्वत:च्या हिमतीवर निवडणूक लढवीन. मग माझा विजय होवो अथवा पराभव होवो. त्याची मला किंचितही पर्वा नाही

क ला टरा

अर्थ मंत्र्यांना तर तेल मीठ विकण्याची अक्कल नाही. ज्यांची साधे बेलदाराचे मातीकाम करण्याची योग्यता नाही ते आज एम. पी. व एम. एल. ए. होऊन मासिक ४०० रुपये पगार व २१ रुपये भत्ता खात आहेत.