३२९
बुद्ध धर्माची लाट
कधीही परत जाणार नाही
दि. २४ मे १९५६ रोजी मुंबईत बुद्धजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात
येणार आहे. आपले एकमेव नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पददलीत
समाजाला अचूक मार्ग दाखवून अखिल भारतीयांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचा
आदेश दिला आहे. सत्य, अहिंसा, समता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर
बौद्ध धर्म स्वीकारा, ' असा त्यांचा दिव्य संदेश आहे. त्यांचा हा संदेश
शिरसावंद्य मानून भारतातील अखिल अस्पृश्य जनता धर्मातर करण्यास तयार
झाली आहे. भारतीय बौद्धजन समितीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केव्हा
आणि कोठे धर्मांतर करणार आहेत, सार्वत्रिक की सामुदायिक धर्मांतराचा |
कार्यक्रम कोठे आणि कसा पार पाडावा, अशा आशयाची शेकडो पत्रे आलेली । आहेत. याबाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे समितीमार्फत पत्रव्यवहार
| करण्यात आलेला आहे. सर्व लोकांच्या माहितीसाठी त्यांनी पाठविलेल्या पत्राचा
, आशय खालीलप्रमाणे देत आहोत,--
'' मी मागे जाहीर निवेदन काढून येत्या वैशाख पौर्णिमेला धर्मांतर करण्याचा
माझा मनोदय जाहीर केला होता. त्याप्रमाणे अस्पृश्य समाजातील व इतर
वर्गीयांपैकी शेकडो लोक धर्मांतर करण्यास तयार झाले आहेत, हे ऐकून
मनाला समाधान वाटते व धर्मांतर करण्यास तयार झालेल्या सर्व लोकांचे मी
मनापासून अभिनंदन करतो. तुमची सामुदायिक धर्मातराची इच्छा पूर्ण
व्हावी म्हणून मी अनेक ठिकाणी दौराही काढणार आहे. आपणाप्रमाणेच
माझ्याकडे उत्तर भारतीयांचीही शेकडो पत्रे आली आहेत. त्यांच्या शाखा
स्थापून त्यामार्फत प्रचंड बहुसंख्येने धर्मातरास योग्य तो अवसर सर्वाना मिळावा
यासाठी आपले धर्मातर चारपाच महिने पुढे ढकलावे अशी त्यांनी विनंती
केल्यावरून मी माझे धर्मांतर येत्या ऑक्टोबर महिन्यात करण्याचे योजिले
आहे. आपण इतके दिवस थांबलात तसे काही दिवस थांबाल अशी आशा
बाळगतो. येत्या वैशाख पौर्णिमेस तुम्ही सर्वांनी गतवर्षी प्रमाणेच २५०० वी
बुद्ध जयंती साजरी करावी. “