२५-५-१९५६ बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही - Page 508

४६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्राचा आशय भारतीय बौद्धजन समितीच्या सर्व शाखांनी लक्षात घेऊन २५०० वी भगवान बुद्ध जयंती आपआपल्या भागात महान प्रमाणात साजरी करावी ही विनंती. असे पत्रक का. वि. सवादकर, बा. कृ. कबीर, भ. स. गायकवाड, चिटणीस, भारतीय बौद्ध जनसमिती, मुंबई यांनी ' प्रबुद्ध भारत ' दिनांक १२ मे १९५६ च्या अंकात प्रकाशित केले.

' यानुसार मुंबई, येथे ता. २४ मे १९५६ रोजी २५०० व्या भगवान बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त भारतीय बौद्धजन समितीतफं नरेपार्कवर प्रचंड सभा झाली. सभेला मुंबईतीलच नव्हे तर बाहेर गावाहूनही लोक आले होते. जवळ-जवळ पाऊण लाख स्त्री-पुरूष-बालके सभेला हजर होते. |

सभास्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन सायंकाळी साडे सहा वाजता झाले. त्यावेळी समता सैनिक दलाच्या गणवेषातील एक हजारें स्वयंसेवकांनी त्यांना शिस्तबद्ध मानवंदना दिल्यानंतर बाबासाहेबांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. |

व्यासपीठावर भारतीय बौद्धजन समितीचे सर्व सेक्रेटरीज, मुं. प्र. शे. का. फेडरेशनचे अध्यक्ष श्री. आर. डी. भंडारे, प्राध्यापक व्ही. जी. राव, अन्तुमामा गद्रे, आमदार कांबळे, श्री. निकुंभ, मुं. प्र. शे. का. फे. चे ज. से., व्ही. एस. पगारे वगैरे प्रतिष्ठित व्यक्ती आणि सौ. माईसाहेब आंबेडकर उपस्थित होत्या. सभेचे. अध्यक्ष मुंबईचे माजी मुख्यप्रधान श्री. बाळासाहेब खेर यांनी बुद्धवंदनेनंतर बौद्ध धर्म आणि बुद्ध चरित्र यावर भाषण केले.

बरोबर साडे सात वाजता डॉ. बाबासाहेबांनी आपल्या महत्त्वपूर्ण भाषणाला प्रारंभ केला. सुमारे सव्वा तास त्यांनी आपले बौद्ध धर्मावरील विचार जनसमुदायापुढे मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

अध्यक्ष महाराज, बंधु आणि भगिनींनो

आज वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध यांच्या २५०० व्या परिनिर्वाण दिनासाठी

मला रंगून येथे ब्रह्मदेश सरकारच्या आमंत्रणावरून हजर असावयास पाहिजे होते. परंतु मी आज मुंबईत या सभेला हजर आहे.

गेली पाच वर्षे मी बौद्ध धर्मावर एक पुस्तक लिहिण्यात गुंतलो होतो. त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या धर्मदीक्षेअगोदर वैशाख महिन्यांत व्हावे या हेतूने मी मुंबईला आलो. परंतु मी एका विलक्षण आजाराने जायबंदी झाल्यामुळे मला ते पुस्तक लवकर लिहून संपविता आले नाही. पुस्तकाची ७०० पाने असून तो ग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो समजणे अवघड