२५-५-१९५६ बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही - Page 509

बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही ४६९

जाईल. म्हणून मी लौकरच त्याचे मराठी भाषांतर करवून घेणार आहे. केवळ याच कामामुळे मला रंगूनला जाता आले नाही. तथापि माझ्यासमोर जमलेला हा जनसमुंदायं पाहून मला अत्यंत आनंद होत आहे.

मी १४ वर्षाचा असतानाच एका सभेत श्री. दादासाहेब केळूसकर यांनी मला भगवान बुद्धाचे एक चरित्राचे पुस्तक बक्षीस म्हणून दिले होते आणि तेव्हापासून बौद्ध धर्माचा माझ्या मनावर पगडा बसला आहे.

मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत. परंतु रामायण, महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का ? असे विचारण्याची कोणाची हिंमत नसे. ज्या पुराणात शूद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी वर्णन आढळते त्या पुराणपुरुषांचे जीवन चरित्र वाचण्यात तरी काय तथ्य आहे? माझ्याइतका | घर्मशास्त्रवेत्ता कोणी नाही. मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का, असा प्रश्‍न विचारल्यावरून त्यांनी उत्तर दिले की '' आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण-महाभारतातील पुराणपुरुषांची जीवन चरित्रे वाचल्यानंतर आपल्या :मनाचा .न्यूनगंड दूर होतो. पण ते मला नीटसे समजले नाही.

महाभारतातील द्रोणाचार्य हा अत्यंत पराक्रमी राजगुरू होता. कौरव आणि पांडव दोघांनाही त्याने शस्त्रास्त्रांची विद्या शिकविली. तरीसुद्धा महायुद्धामध्ये द्रोणाचार्य खरी न्यायाची बाजू न धरता कोरवांच्याच बाजूने लढले. कारण कौरवांची ते नोकरी करीत होते. वास्तविक ज्या कुंतीपुत्र कर्णाची हलक्या कुळातला म्हणून अवहेलना केली जाते तो कर्णच खरोखर वीर व नीतीतत्त्व जाणणारा महान्‌ पुरुष होता.

रामायणातील रामाला आम्ही एकवाणी, एकपत्नी म्हणून संबोधितो. परंतु वाली आणि सुग्रीव यांपैकी एकाची बायको दुसऱ्याला देऊन त्याने त्याचा बाणाने "घात केला. एकपत्नीव्रताच्या गप्पा मारणाऱ्या रामाची सीता जेव्हा रावणाने अशोक वनात नेऊन ठेवली तेव्हा रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने अशोक वनात जाऊन प्रथम सीतेची चौकशी करावयास पाहिजे होती. परंतु मारुतीच्या वारंवार सांगण्यावरूनसुद्धा रामचंद्राने सीतेची चौकशी केली नाही. रावणाशी द्रोह करून लंकेचे राज्य जिंकण्यास मदत करणाऱ्या बिभीषणाला प्रथम राज्याभिषेक

करणे हे कार्य रामाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होते. तेव्हा अशा पुराण-

पुरुषांच्या चरित्रापासून काय लाभ होणार ?

माझे हे बौद्ध धर्माचे वेड फार पुरातन कालापासूनचे आहे. वास्तविक १९५१

सालच्या खानेसुमारीत तुम्हाला सर्वधर्मीय व पंथाचे लोक आढळतील पण उभ्या

भारतात एकही बुद्धधर्मीय माणूस या खानेसुमारीत तुम्हाला आढळणार नाही.