बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही ४७१
तुमची परमेश्वरापुढे शिफारस, रिकमेंड करावी लागेल, तेव्हा मी असा विचार करीन की, मी पृथ्वीवर असताना तुम्ही मला ईश्वराचा पुत्र मानीत होता काय ? मुसलमान धर्माच्या महंमद पैगंबराचीही तीच रिथती आहे. महंमदसुद्धा स्वतःला ईश्वराचा प्रेषित समजतो. पण भगवंताच्या उपदेशात तसा आशय नाही. भगवंतानी सांगितले, केवळ मी सांगतो म्हणूनच नव्हे तर तुमच्या विचारशक्तीला पटेल तरच त्याचे ग्रहण करा. बुद्धानी शोधून काढलेला मार्ग (DiSC०५९५) हा स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने व स्वाध्यायनांने तयार केलेला आहे. कुणा दुसऱ्याच्या पुंजीवर भगवंताचा धर्म आधारलेला नाही.
मार्क्सवाद्यांना काय सांगावे ? त्यांनी भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान अवश्य वाचावे. दुःखी पिडीत लोकांना दुःखातून मुक्त करण्याचा खरा मार्ग भगवंताने शोधून काढला. हजारो पिडीतांना त्यांनी स्वयंप्रकाशाने दु:खमुक्त केले. आलार- कालाम याच्या ज्ञानाने भगवंताचे समाधान झाले नाही. कारण त्याची शिकवण अपूर्ण होती. सांख्य तत्त्वज्ञानवेत्ता कपिल महर्षी यांनी तत्त्वज्ञानाच्या आधारे सांगितले की पृथ्वी ही जड आहे. हलत नाही. मग तिचा विकास कसा होतो ? ती तऱ्हेतऱ्हेची रूपे कशी घेते ? कपिलाने सांगितले की, पृथ्वीच्या उदरात रज, तम, आणि सत्व हे गुण जेव्हा समतोल (8818106) प्रमाणात असतात तेव्हा पृथ्वी जड वाटते. परंतु या त्रिविध गुणांचा समतोलपणा जेव्हा ढासळतो तेव्हा पृथ्वी अस्थिर होते व मग पृथ्वी तऱ्हेतऱ्हेची रुपे घेते. कपिलाने एवढेच सांगितले. परंतु त्यामुळे लौकिक दुःखाचे परिहरण होणार नाही, हे भगवंताच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी चार आर्य सत्यांचा अवलंब केला.
बायबलमधील मोझेससारखी माझी स्थिती होण्याचा संभव आहे. पॅलेस्टाईन- मधील गुलामांना सुखी करण्यासाठी मोझेस यास फार परिश्रम करावे लागले. मोझेस इजिप्तमधून गुलाम विकत आणीत असे व त्यांना पॅलेस्टाईनमध्ये नेऊन सुखी व स्वतंत्र करीत असे. या प्रयत्नात मोझेस यास अत्यंत कष्ट सहन करावे लागले. इजिप्तच्या बाहेर जात असताना मोझेसला फार हाल काढावे लागले. कदाचित मजवरही फार हालअपेष्टा सहन करण्याची पाळी येईल पण तरीसुद्धा माझ्या अस्पृश्य समाजास घेऊन मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार हे
निश्चित. |
मी माझे धर्मांतर या ऑक्टोबरमध्ये मुंबईत करणार आहे. त्यापूर्वी या धर्मावर माझे एक पुस्तक मी प्रसिद्ध करणार आहे. भगवंताच्या बुद्ध धर्मात जी त्रुटी आहे त्याचा सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मांडणार आहे. बुद्ध धर्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे. संघ दीक्षेवर त्याचा विपरीत परिणाम