२५-५-१९५६ बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही - Page 512

४७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

होतो. उपासकाच्या मनाची परिपूर्ण तयारी झालेली नसते. परंतु माझ्या धर्मात उपासकांनाही धम्म दीक्षा दिली जाईल. तत्पूर्वी धम्म दीक्षेवर मी एक पुस्तक लिहिणार आहे. ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागेल व त्या पुस्तकातील ठराविक प्रश्‍नांची उत्तरेही प्रत्येकाला द्यावी लागतील. तरच त्याला बुद्ध धर्मात प्रवेश मिळेल. बुद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाने शुभ्रवस्त्र परिधान केले पाहिजे.

धर्म नष्ट का होतो याचा ' मिलिंद पन्ह ' या ग्रंथात खुलासा आहे. धर्माला जवळजवळ तीन प्रमुख कारणांनी ग्लानी येते. पहिले कारण म्हणजे धर्मतत्त्व _ अबाधित नसेल किंवा पुरतेपणी विचार न करता धर्मतंत्त्वाची बांधणी केली गेली तर धर्माला ग्लानी येते. दुसरे कारण धर्मातील वितंडवाद. ज्या बाजूला वादविवाद पटूंचा भरणा जास्त असतो त्या धर्मपंथाचा नेहमी जय होतो. तिसरे कारण म्हणजे धर्मतत्त्व हे सामान्यजनांना कळण्याजोगे असले पाहिजे.

अंफगाणिस्तान हा सबंध देश एकेकाळी बुद्धभिक्षुकांचा होता. भगवान बुद्धांचा जगामध्ये सर्वात भव्य आणि उंच पुतळा अफगाणिस्तानमध्ये आहे. परंतु धर्मवेड्या मुसलमानांनी ७ हजार बुद्धभिक्षुकांची मुंडकी तोडून रस्त्यावर त्याचा ढीग घातला व म्हणून तेथून बुद्धभिक्षु पळून गेले.

आता बुद्ध धर्माची लाट आली तर ती कधीही परत जाणार नाही. धर्म स्थापनेसाठी देवळांची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु आपल्या स्वकष्टाने मला एक असे देऊळ बांधावयाचे आहे की जे तुम्ही कधी-पाहिले नसेल. पंण त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. तुम्ही पैसे जमवून देत असाल तर बांधीन व चांगले बांधीन. आपल्या स्वपराक्रमाने बांधीन, दुसऱ्याच्या ऑजळीने बांधणार नाही.”

| ७ ७ ७

* प्रबुद्ध भारत : २ जून १९५६.