१०-६-१९५६ स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा - Page 514

४७४ डॉ, बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पूर्वी आर्य (ब्राह्मण) पूजाविधी करीत असताना हजारो पशुंचा बळी देत असत. पशु हत्त्येचा इतिहास (गाई आणि म्हशींची कत्तल) जर आपण पाहिला तर ब्रिटिशांनी आणि मुसलमानांनी या देशातील जेवढ्या गाई मारून खाल्ल्या नाहीत त्यापेक्षाही अधिक गाई त्या काळातील ब्राह्मणांनी खाल्लेल्या आहेत.

अगोदर चार प्रकारचे ब्राह्मण होते. मग कालांतराने त्यांच्या सतरा पोटजाती झाल्या. ब्राह्मण घर्मग्रंथांवरून असे दिसून येते की, गोमांसाच्या वाटणीवरून, गाई-म्हशींच्या कातड्याच्या मालकीबाबत त्या ब्राह्मणांनी आघसात नेहमी युद्धे केली आहेत. ब्राह्मणांच्या देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी जे पशुहत्या करीत नसत त्यांना ब्राह्मण धर्मानुयायी समजण्यात येत नसे. याचमुळे बौद्ध धर्म अस्तित्त्वात आला. बौद्ध धर्माने मानवाला विचार करण्याचे स्वातंत्र्य देऊन पूर्ण विचाराअंती योग्य मार्ग अनुसरण्याची परवानगी दिलेली आहे. नैतिकतेवर आधारलेल्या अहिंसेचा उपदेश बौद्ध धर्मात आहे. याबद्दल आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. अहिंसेचा अर्थ लोकांनी चुकीचा लावला. माणसाने पशुहत्या करू नये किंवा हातात तरवार घेऊन देशरक्षणाकरिताही लढू नये. ही अहिंसा नाही. अहिंसा दोन गोष्टीवर आधारलेली आहे. आवश्यकतेसाठी हत्त्या आणि इत्या करण्याची इच्छा होणे! जर राष्ट्रावर परचक्र आले, देश संकटात सापडला तर हातात तरवार घेऊन रााष्ट्ररक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन समरांगणात उड़ी घेणे आणि शत्रुंचा निःपात करणे, त्यांची हत्त्या करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. याचा अर्थ ही हिंसा आवश्यक होती. त्याला बौद्ध तत्त्वज्ञानात उच्चतम प्रतीची अहिंसा म्हणतात. दुसरी, मारण्याची इच्छा होणे. म्हणजे स्वत:च्या समाधानाकरिता पशुबली देणे, पशुहत्या करणे ही हिंसा होय. ॒

बौद्ध तत्त्वज्ञान जसेच्या तसे उचलून त्यात आपली जातीभेद वगैरे तत्त्वे दडपून देऊन हिंदू तत्त्वज्ञानी ते आपले म्हणून मिरवितात. ब्राह्मण धर्माचे लेखक म्हणतात की, वेद प्रजापतीने दिले. भगवान बुद्धाने प्रश्‍न विचारला की प्रजापती कोणत्या ठिकाणाहून जन्माला आला. हिंदुंचे वेद आणि गीता यांचा अभ्यास केला तर भगवतगीता हे दुसरे तिसरे काही नसून ' धम्मपद ' आहे. ही धम्मपदाची नक्कल करताना त्यात जाती संस्था घुसडून देण्यास ब्राह्मण विसरले नाहीत. स्वतः श्रीकृष्णाने आपल्या शिष्यांना उपदेश केला की, ब्राह्मणेतरांना कोणतेही ज्ञान देऊ नका अथवा धर्मोपदेश करू नका !

प्रार्थना केल्याने अथवा कोणाचे पाय धरल्याने ते तुम्हाला काही देणार नाहीत. झगडा करावयाचा तर आपल्याला अंगात पहिलवानासारखे बळ पाहिजे. पहिलवान खूप खातो, पचवितो आणि सामर्थ्य निर्माण करतो.