१०-६-१९५६ स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा - Page 515

स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ४७५

तसे तुमचे मानसिक बल वाढले पाहिजे. जर सत्य व योग्य मार्गाचे अवलंबन केले तर तुम्हाला मानसिक शक्ती प्राप्त होईल. भित्रे भागूबाई कधीच लढू शकत नाहीत. मी ह्या अस्पृश्यतेचे वैगुण्य घालविण्याचा प्रयत्न कसोशीने अनेक वर्ष करीत आलो. परंतु अद्याप माझा उद्देश पूर्णपणे सफल झाला नाही. माझे मन मजबूत आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत लढेन. जुलूमशाहीविरूद्ध झगडण्यासाठी नैतिक धैर्य व मानसिक बल पाहिजे. ते तुम्हास प्राप्त व्हावे यासाठी मी नवा मार्ग तुम्हाला दाखवितो. तुम्ही जर बुद्धमार्गाचे अनुसरण केले तर जगात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल एवढेच नव्हे तर, तुम्हाला बलप्राप्ती होईल आणि तुमच्या मुलाबाळांचा भविष्यकाळ उज्वल राहील. समानता आणि स्वाभिमानाने जगण्याचे स्थान दाखविल्याबद्दल ते तुमचे आभारी राहातील.

मी असे ऐकले आहे की, लोकांनी जुलूमाविरूद्ध झगडे करू नये यासाठी त्यांना आपल्या पक्षात ओढण्यासाठी काँग्रेस काही लोकांना पैसे वाटत आहे. सरकार मलाही पैसा घेण्यास सांगत होते. हेतु हा की माझे तोंड बंद करावे. पण मी पैसा कधीच घेतला नाही, हे तुम्हाला माहीत आहेच. माझ्या उदरनिर्वाहाकरिता मी आपले श्रम करून पैसे मिळवीन आणि अस्पृश्यांच्या हितासाठी व हक्कासाठी शेवटपर्यंत झगडत राहीन. एवढ्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की, काही झाले तरी तुमचा स्वाभिमान कोणी विकत घेऊ शकणार नाही याची खबरदारी घ्या आणि समाजाची मान नेहमी उंच राहील यासाठी डोळ्यात [तेल ] [घालून ] [दक्ष ] राहा. सर्वस्व पणाला लावून तुमचा आणि समाजाचा स्वाभिमान [कायम ] राखा. मी प्रेषित नाही, पैगंबर नाही किंवा [ईश्वराचा ] [प्रतिनिधीही. ] [नाही. ] मी भगवान बुद्धाचा विनम्र शिष्य आहे. मी [तुम्हाला ] [हा ] [मार्ग ] [दाखवित ] [आहे. ] जर तुम्हाला हा मार्ग योग्य वाटत असेल [तर ] [त्याचे ] [अनुकरण ] [करा. ] परंतु हा मार्ग स्वीकारण्यापूर्वी त्याचा सर्वागीण विचार [करा. ] भगवान बुद्धाने आपल्या अनुयायांना सांगितले की, कोणत्याही [गोष्टीचा ] [स्वीकार ] [पूर्ण ] [विचाराअंती ] करा. आंधळेपणाने स्वीकार करू नका. निसर्गतः मानव स्वतंत्र आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन की, स्वतंत्र [विचारसरणीचे, ] [स्वतंत्र ] [वृत्तीचे ] [निर्भय ] [नागरिक ] [व्हा ] [! ]