३४१
एकेकाळी अफगाणिस्तान
हा देश संपूर्ण बौद्ध होता
दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी [बुद्ध ] जयंती [निमित्त ] ' बौद्धजन महासभा ' (अ. भा. बौद्धजन समितीची दिल्ली येथील शाखा) तफे दिनांक २३ जून १९५६ रोजी सभा आयोजित केली होती. सभेत दिल्ली आणि आसपासच्या विभागातील निवडक अस्पृश्य आणि बौद्धजन उपस्थित होते.
प्रचंड मिरवणूक
सभेच्या पूर्वी दिल्ली शहरातून भगवान बुद्धाच्या प्रतिमेची आणि त्यांच्या जीवन प्रसंगावरील लहान मुलांनी अभिनित केलेल्या सजीव दृश्यांची प्रचंड मिरवणूक काढण्यात आली होती.
मिरवणुकीत भाग घेऊन ती यशस्वी करणाऱ्या सुयोग्य कार्यकर्त्यांना व बालक अभिनेत्यांना डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते रौप्य पदके व भगवान बुद्धाच्या प्रतिमा वितरण समारंभ झाला.
या समारंभाप्रसंगी प. पू. बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले,
बंधु आणि भगिनींनो,
बौद्ध धर्म हा वास्तववादी धर्म आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धाने आपल्या धर्माची उभारणी केली नाही. त्याचमुळे ईश्वर आणि आत्मा किंवा अशाच भलभलत्या गोष्टी बुद्धाला मान्य नव्हत्या. जे मानवाला अनुभवता येत नाही किंवा ज्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, अशा कोणत्याही गोष्टीवर बुद्धाचा विशवास नव्हता. |
प्रत्येक धर्माला दोन बाजू असतात. एक विचारावर आधारलेली तात्त्विक आणि दुसरी नीती नियम. यातील एक अधिक महत्त्वाची व दुसरी कमी महत्त्वाची आहे, असे म्हणता येणार नाही. ब्राह्मण धर्माच्या या दोन्ही बाजू