एकेकाळी अफगाणिस्तान हा देश संपूर्ण बौद्ध होता ४७७
पडताळून पाहिल्या तर हा धर्म विघातक असल्याचे आपल्याला आढळून येईल. कारण मानवा-मानवात असमानता व विषमता ही हिंदू धर्माची वैचारिक बैठक आहे. ब्राह्मण भ्रष्ट असो की महामूर्ख असो तो सर्वश्रेष्ठ आहे, ही या धर्माची शिकवण ! ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय कनिष्ठ, क्षत्रियापेक्षा वैश्य आणि वैश्याहून . शूद्र. शेवटच्या तीन वर्णाना अध्ययनाचा अधिकार नाही. ब्राह्मणाला अध्ययनाचा अधिकार असल्यामुळे साहजिकच सर्व वर्गासाठी विचार करण्याचे राखीव अधिकार ब्राह्मणांकडे होते. एकट्या क्षत्रियाने देशाचे रक्षण करावे. कशी आत्मघातकी व्यवस्था होती ? एकाच्या हाती तलवार देऊन त्याच्यावर विसंबून राहाण्यास सर्वांना सांगण्यात आले. याचा परिणाम हा झाला की जेव्हा जेव्हा क्षत्रियांचा पराभव झाला तेव्हा तेव्हा सर्व देशच्या देश शत्रुंनी पादाक्रांत केला.
माझ्या या विधानाला इतिहास साक्ष आहे. १९३९ ते १९४५ या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात युरोपात देखील उण्यापुऱ्या १०० लढाया झाल्या. . त्यातील काहीत पराभव झाला तर काही जिंकल्या गेल्या. परंतु सर्व युरोपभर हिटलर कधीच स्वामित्व गाजवू शकला नाही. सरते शेवटी, हिटलरचा पराभव होऊन सर्व युरोपचे रक्षण झाले. कारण भारतासारखी तेथे एकाच वर्णावर देशरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली नव्हती. जेव्हा जेव्हा मुसलमानांनी भारतावर आक्रमण केले आणि रजपुतांचे शिरकाण केले तेव्हा तेव्हा जणूकाही सर्व देशच निर्वीर्य झाला. |
ज्यांचे ध्येय फक्त नफा मिळविण्याचे व संपत्ती गोळा करण्याचे आहे, असा एक वर्ग आहे. त्यांना आपंण ' वाणी, ' ' बनिया ' अथवा उत्तरेकडे ' लाला * या नावाने ओळखतो. देशाच्या कल्याणाची अथवा इतर कोणाच्या भलाईची चिता ते कधीच करीत नाहीत. संपत्ती जमा करण्यात त्यांच्यासारखा हावरा आणि . महालोंभी माणूस सापडणार नाही. देश तिकडे युद्धात हरला तरी चालेल पण हा युंद्ध साहित्यात देखील नफा उकळल्याशिवाय राहाणार नाही.
प्रत्येक पौर्णिमेला असे समारंभ घडवून आणण्याचा समितीचा मनोदय आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेत माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि [गांभीर्याने ] करण्याची संधी मिळते, हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य [होय. ]
गत काळात दैनंदिन्या, रोजनिशा, कॅलेंडर्स नसायची. तेव्हा कालगणमा
करण्यासाठी लोक पौर्णिमेच्या दिवशी उपवास करीत असत. इतर धर्मीयांप्रमाणे उपवासामुळे आपली सर्व पापे धुवून जातील आणि आपल्याला स्वर्गलाभ होईल
- वि (वाय) ४११-३२