२३-६-१९५६ एकेकाळी अफगाणिस्तान हा देश संपूर्ण बौद्ध होता - Page 519

एकेकाळी अफगाणिस्तान हा देश संपूर्ण बौद्ध होता ४७९

` जर ' नारायण ' स्वतःच खरा असेल तर ' सत्य ' हा शब्द आणखी का जोडण्यात आला आहे ? यांचा हा नारायण ' नाहीच. ब्राह्मण-पंडितासारखाच तो पिळवणूक करणारांचा रक्षणकर्ता आहे एवढेच. हे सर्व फोल आचारविधी आहेत

काही लोक गंगेवर स्नानासाठी जातात. गंगेच्या किनाऱ्यावर ब्राह्मण बसलेले असतातच ! स्नानासाठी जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडून दक्षिणा (पैसा) उकळण्यासाठी ब्राह्मण तयार असतो. गंगा ही नदी अविरत वाहत आहे. गंगा काही स्नानासाठी पैसे मागत नाही किंवा कोणाला घ्यायला सांगतं नाही. ब्राह्मणाला एक आणा देऊन ब्राह्मणाने काही मंत्र पुटपुटावे आणि नंतर गंगास्नानासाठी परवानगी द्यावी, याची काही आवश्यकता आहे काय ? भोळ्या लोकांची समजूत अशी की अशारितीने ब्राह्मणाला दक्षिणा देऊन गंगा नदीत स्नान केल्यास सर्व पापे धुवून जातात: काय मूर्ख आहेत ते सारे! गंगा नदी आणि लोक यांच्यामध्ये ब्राह्मण हा दलाल मानण्यात येतो, हे मोठेच आश्चर्य आहे.

जर पाप गंगा स्नानाने व ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे दिल्याने धुवून जात असेल, नाहिसे होत असेल तर माणूस माणसाविषयी मुळीच सहानुभूती बाळगणार नाही. परस्परांवर प्रेम करणार नाही. अशा अवस्थेत कायद्याची आवश्यकताच , उरत नाही आणि सरकारचेही महत्त्व शिल्लक राहात नाही. परंतु हे स्वीकारण्यास कोणीही तयार नाही

मी मंत्री असताना एकदा हरिद्वार येथे गेलो होतो. मंत्री असल्यामुळे मला तेथे चारी बाजूंना पाणी असलेले एक लहान मंदीर दाखविण्यात आले. त्याला ' हर की पायरी ' म्हणतात. तेथील पाण्यात माणसाची हाडे आणि इतर सर्व घाणेरड्या वस्तू जमा झाल्या होत्या. एखादे गटार त्यापेक्षा बरे असे वाटत होते. अशा त्या ' हर की पायरी ' च्या घाण पाण्यात प्रत्येक स्त्री-पुरुष आंघोळ करीत होते. त्या पाण्यामध्ये मृतांच्या अस्थी टाकल्यावर ब्राह्मणांच्या मध्यस्थीने त्यांचे आप्त-नातलग स्वर्गाला जातील आणि तेथे स्नान केल्यावर हे सगे-सोयरे पवित्र होतील, ही खुळचट श्रद्धा का असावी, हे मला कळत नाही. मला वाटते, या सर्व गोष्टींचा विचार केलाच पाहिजे.

सोने कसोटीवर खरे उतरल्याशिवाय विकत घेत नाहीत तसेच धर्म देखील मानवाला उपयोगी आहे किंवा नाही या कसोटीवर. घासून पारखून पाहिला पाहिजे. जोपर्यंत धर्माची अशी परीक्षा होत नाही तोपर्यंत तो स्वीकारणीय ठरणार ; नाही. आमचे जुने लोक अशिक्षित असल्यामुळे ब्राह्मणांच्या प्रत्येक शब्दावर त्यांनी भोळेपणाने विशवास ठेवला. आता काळ बदलला आहे; तुम्ही संपूर्ण विचाराअंती धर्माचा स्वीकार केला पाहिजे