एकेकाळी अफगाणिस्तान हा देश संपूर्ण बौद्ध होता ४८१
मुसलमानांनी बौद्ध व हिंदू धर्मावर आक्रमण केले होते, ही गोष्ट खरी आहे. त्यांनी हिंदू व बौद्ध दोन्ही धर्माची मंदिरे उध्वस्त केली परंतु बौद्ध धर्माचा जो संबंध आहे त्याबाबतीत एवढेच सांगता येईल की बऱ्याच भिक्खुंची कत्तल होऊन काही उरलेल्यांनी देशांतर केल्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ते कळेनासे झाले. बौद्ध अनुयायी अन्धःकारात चाचपडत होते. कारण भिक्खु हा जन्मत: भिक्खु होत नाही ; तो घडविला जातो. त्याच्यावर अनेक संस्कार होतात. असे भिक्खु मुस्लिम आक्रमणानंतर देशात उरले नव्हते.
. भिक्खु विद्वान आणि तावून सुलाखून निघालेला असावा लागतो. भिक्खुंच्या शिक्षणाच्या निरनिराळ्या पायऱ्या असत. अठरा वर्षाचा विद्यार्थी ज्येष्ठ भिक्खुकडे पाच वर्षे उच्च धार्मिक विद्यार्जनासाठी पाठविण्यात येत असे. तेथे चांगला अभ्यास केल्यावर वयाच्या पंचविसाव्या वर्षी तो ' श्रामणेर ' होण्याची योग्यता संपादन करीत असे. ' श्रामणेर ' पुढे पाच वर्षे धकाधकीच्या आयुष्यातून गेल्यावर त्याची भिक्खु म्हणून ' उपसम्पदा ' होत असे. म्हणजे साधारणतः पंचवीस वर्षे वयापर्यंत योग्य विद्याध्ययन करून, चांगले आचरण ठेवण्यास उतरलेलाच भिक्खु होऊ शकत असे.
ब्राह्मण पुरोहितांचे तसे काहीच नव्हते. ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला की झाला तो पुरोहित. त्याला विद्याध्ययनाची, सद्वर्तनाची किवा दुसरी कसलीही अट नव्हती. त्यामुळे जरी ब्राह्मण धर्मावर हल्ला झाला, त्यांची मंदिरे नष्ट झाली, तरी ब्राह्मण जन्माला येऊ लागले आणि ते आपल्याला ब्राह्मण धर्माचे म्हणवू लागले.
भिक्खुंचे अस्तित्व न राहिल्याने साधारण जन अशा ब्राह्मणांच्या तडाख्यात सापडले. या ब्राह्मणांना त्यामुळे मोकळे रान मिळाले व ते आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करू लागले.
ईश्वर आहे काय ? गरीब लोकांची पिळवणूक करून धर्माच्या नावाखाली ज्यांना लुटावयाचे आहे, त्यांनीच ईश्वराचे बुजगावणे उभे केले आहे.
महिलाही या सभेला उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतु स्वतःचे चेहरे पदराने झाकून ठेवणे चांगले नाही. निर्भयतेने जीवन जगण्यास
शिका. अस्पृश्य स्त्रियांची सर्वागीण सुधारणा झाल्याखेरीज अस्पृश्य समाजाची
सुधारणा पूर्ण होणार नाही.
७ ७ ७