३४२
बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे
' भारतीय बौद्धजन समितीचे प्रवर्तक आणि अध्यक्ष, भारतातील दलित जनतेचे कंठमणी, आंतरराष्ट्रीय किर्तीचे घटना-पंडित, अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे संस्थापक आणि कर्णधार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येत्या १४ ऑक्टोबर १९५६ च्या सकाळी ८ वाजता नागपूर येथे बौद्ध धर्म दीक्षा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा
संदेश
२६, अलीपूर रोड,
दिल्ली, ता. २३ सप्टेंबर १९५६
बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित
केले आहे. येत्या दसऱ्यास तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी
नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे.
या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म-दीक्षा विधी
समारंभ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी
जाहीर व्याख्यान होईल.
बी. आर. आंबेडकर,
२३ सप्टेंबर १९५६.
' प्रबुद्ध भारत ' च्या संपादकांना एक विशेष संदेश डॉ. बाबासाहेबांनी पाठविला असून बौद्ध धर्म स्वीकारावयाचा वर दिलेला दिवस, तिथी आणि समय कळविला आहे.
विजयादशमीचा मुहूर्त धर्मदीक्षेसाठी साधण्यात अत्यंत औचित्य आहे. विजया- दशमी ही महान बौद्ध सम्राट अशोकाच्या विजयाचा दिन म्हणूनच पाळली जाते. अलिकडील तिनशे वर्षात पावसाळ्याच्या समाप्ती नंतर मराठे सीमोल्लंघन या विजयादशमीला करीत असत. अस्पृश्य आणि दलित समाजाच्या डोक्यावर