४८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
प्रतिज्ञेची पूर्ति
१९३५ साली डॉ. बाबासाहेबांनी [' ] मी हिंदू म्हणून [जन्माला ] [आलो ] [असेन ] [पण ] हिंदू म्हणून मरणार नाही ' अशी प्रतिज्ञा केली आहे, तीची [पूर्तता ] [२१ ] [वर्षानंतर ] होत आहे.
आर. डी. भंडारे '*
बौद्ध धर्म स्वीकारासंबंधी डॉ. बाबासाहेबांचे विचार
“ जे भगवान बुद्ध या देशात नांदत होते, त्यांचा तो
धर्म आजही या देशाचा धर्म होईल यात मला शंका
वाटत नाही.
मनुष्यत्व, समदृष्टी, बंधुभाव, प्रेम यांनी हा खरा
धर्म झालेला आहे, हा धर्म तुम्ही स्वीकारा.
मी जे धर्मांतराचे कार्य आरंभिले ते नीट समजवून
घ्या ;'त्याचे महत्त्व पारखून घ्या व काय करायचे ते
ठरवा, मात्र ते ठरल्यावर जुने ते टाकून द्या. आज
मी २० वर्षे तुमच्या बद्दल विचार करीत आहे.
जो निरनिराळया धर्माचा अभ्यास, मानवास करिता
येण्यासारखा आहे, तो मी केला आहे व शेवटी माझा
अनुभव असा आहे की, बुद्धधर्माशिवाय दुसरा धर्म
जगाला नाही. . जगात जर कोणता धर्म राहावयाचा
असेल तर तो बुद्धधर्मच होय. “२
ES ' ज्यांना माझ्याबरोबर बौद्ध धर्माचा स्वीकार करावयाचा
असेल त्यांनी यावे. ज्या व्यक्तिचे मन स्वतंत्र नाही तो
स्वतंत्र नाही. मी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा पूर्ण
निश्चय केला आहे. ज्यांना त्याग करावयाचा असेल
त्यांनी पुढे यावे. मला जे कर्तव्य करावयाचे आहे ते मी
करणार. माझ्या आयुष्यात अनेक कामे करावयाची
आहेत. जितकी कामे होतील तितकी करीन. माझे
वडील हिंदूधर्मात वारले. माझा परिवार याच धर्मात
वारला, मीही येथे राहून चालणार नाही. अव्यवहारी
मार्ग मला बदललाच पाहिजे. ''३