बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ४८७
दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्यांना विनंती
दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्यांनी स्वच्छ पांढरी वस्त्रे परिधान करून येणे आवश्यक ` आहे. मंडपात बायांसाठी व पुरुषांसाठी बसण्याची वेगवेगळी व्यवस्था आहे. तसेच प्रेक्षकांसाठी व दीक्षा घेणाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था आहे. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्यांची नोंदणी दिनांक ११ ऑक्टोबर १९५६ पासून समितीच्या कार्यालयात तसेच दीक्षेच्या जागी चालू राहील. नोंदणी करवून घेणाऱ्याला विनामूल्य दोन तिकीटे मिळतील. ती सांभाळून ठेवावीत. मंडपातील दीक्षार्थी विभागात प्रवेश मिळण्यास त्या रोज कामी पडतील. जे जे स्वच्छ पांढरी वस्त्रे घालून येतील अशाच दीक्षार्थीना दीक्षार्थी विभागात प्रवेश मिळेल.
स्वयंसेवकांना विनंती
स्वयंसेवकांनी पांढरा हाफ शर्ट व पांढरी हाफ प्यांट घालून यावे. त्यांनी आजपासूनच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्या कार्याची माहिती करवून घ्यावी व त्याप्रमाणे आपले कार्य तत्परतेने करावे. दीक्षा समारंभाचे वेळी ज्यांची ज्या ठिकाणी नेमणूक केली जाईल त्यांनी त्या ठिकाणीच दीक्षा घ्यावी. दीक्षा घेणाऱ्यांनी काय म्हणावयाचे असते हे लाऊड स्पीकरवरून ऐकू येईलच.
त्याप्रमाणे स्वतः म्हणावे.
बाहेरगावच्या स्वयंसेवकांच्या पथकातील मुख्यांनी स्वयंसेवक दलाचे प्रमुख श्री. क. वि. उमरे, श्री. सच्चिदानंद माणके व आर. आर. पाटील यांना भेटून आपल्या कार्याचा वाटा उचलावा.
जनतेस विनंती
हे धार्मिक कार्य परमपवित्र आहे. समारंभाचे सर्व कार्यक्रमात शांतता व स्वच्छता अगदी परिपूर्ण राहील असेच वर्तन प्रत्येकजण ठेवील अशी आशा
आहे. मोहल्ल्यातून निघताना मोहल्ल्यातील सर्व स्त्री-पुरुषांनी एकत्रित जमावे
व सतत ' बुद्धं सरणं गच्छामि ', ' धम्मं सरणं गच्छामि ', सौम्य आवाजात व मधून
मधून ' भगवान बुद्ध की जय ', ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ', आणि
' बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार ' म्हणत पायी जावे. ज्यांना
सोबत झेंडे आणावयाचे असतील त्यांनी बौद्ध झेंड्याविषयी समितीच्या कार्यालयातून
माहिती मिळवून त्याप्रमाणे झेंडे तयार करावेत.
सकाळच्या व सायंकाळच्या मधल्या वेळात देखील शांततेनेच भोजनादि कार्ये
उरकून घ्यावीत ही विनंती आहे. लाखो लोकांची उपस्थिती असल्यामुळे
'' क्यू “ लावण्याचा प्रसंग येईल तिथे तिथे रांगेत राहाणे आवश्यक राहील. आपल्या