१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 528

४८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

शांत चित्तावर समारंभाच्या व्यवस्थेची यशस्विता अवलंबून आहे. मंडपाबाहेरील ' चौकशी दफ्तरात ' चौकशी करावी.

कार्यक्रम

स्थळ : माता कचेरी (श्रद्धानंद पेठ) जवळील भव्य पटांगण

कार्यक्रम-दिनांक १२ ऑक्टोबर १९५६ पासून १६ ऑक्टोबर १९५६ पर्यंत राहील. खुलासेवार कार्यक्रम वेगळे पत्रक काढून प्रसिद्ध केले जातील.

अध्यक्ष-पंडित रेवाराम कवाडे चिटणीस-श्री. वा. मो. गोडबोले,

उपाध्यक्ष-श्री. स. म. मेश्राम सहचिटणीस-श्री. मा. डो. पंचभाई उपाध्यक्ष-श्री. एच. डी. आवळे सहचिटणीस-श्री. पंजाबराव शंभरकर उपाध्यक्ष-श्री. मारोतराव साखरकर सहचिटणीस-श्री. क. वि. उमरे

उपाध्यक्ष-श्री. एच. एल. कोसारे सहचिटणीस-श्री. बा. ना. वैद्य कोषाध्यक्ष-श्री. द. ल. पाटील. सदस्य-श्री. डब्ल्यू. एस. कामळे

सदस्य-डॉ. रामटेके इत्यादी २५ "

'' नागपूर येथे होणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या

बौद्ध दीक्षा विधीस लाखोंनी हजर रहा

१४ ऑक्टोबरला आपापल्या वस्तीत सामुदायिक बुद्ध वंदना साजरी करा

तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसरा सीमोल्लंघनाच्या दिवशी बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचे एकमेव भारतीय प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूर येथे बौद्ध धर्म दीक्षा घेणार आहेत हे आता सुप्रसिद्ध झाले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या भारतीय दलित वर्गाच्या एवढेच नव्हे तर अखिल भारत देशाच्या जीवनातील हा सर्वश्रेष्ठ व अभूतपूर्व असा समारंभ आहे. अर्थात या समारंभासाठी, सर्व दलित व इतर भारतीय बंधुभगिनींनी लाखोंच्या संख्येने हजर राहावे, अशी त्यांना आग्रहाची विनंती आहे.

नागपूर शहरी, या समारंभाबाबत प्रचंड प्रमाणावर तयारी चालू आहे. सर्व दलित कार्यकर्ते अक्षरशः तन-मन-धनाने या समारंभाच्या व्यवस्थेसाठी, प्रयत्नात

गढून गेले आहेत आणि सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक लोकसमुदाय हजर राहील

असा अंदाज आहे.

भारतातील सर्व राज्यांमधून या समारंभास दलित बांधव हजर राहातील.

गुरूत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे, सर्व भारतातील दलित जनता नागपूर येथे जमा