बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ४८९
होणार आहे. रेल्वे, मोटारी, बैलगाड्या यांची नुसती रीघ नागपूरच्या रस्त्याने लागून राहिली आहे. नागपूरला जमणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे आपले साहित्य ` सुटसुटीत ठेवावे, त्याचप्रमाणे वेळप्रसंगी, मुक्कामाच्या सोयीसाठी, आपला छोटा बिछानाही सोबत घ्यावा. ।
ज्या दलित बांधवांना नागपूरला येण्याची इच्छा असूनही, काही अडचणीस्तव येता येत नसेल त्यांचे लक्ष, खाली प्रसिद्ध केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या चिटणीसाच्या निवेदनाकडे आम्ही वेधू इच्छितो.
जाहीर आदेश
बंधु आणि भगिनींनो,
आपले पूजनीय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूर मुक्कामी दिनांक १४-१०-५६ रोजी सिमोल्लंघनाच्या सुमुहूर्तावर बौद्धधर्माची दीक्षा घेत आहेत. नागपूरकरांनी ह्या कामी अविश्रांत मेहनत घेऊन लाखो रुपयांची झीज सोसली आहे. ह्या त्यांच्या दिव्य कार्याने मुंबईकरांना नवी चालना मिळाली असून महामुंबईत चार लाख सभासद नोंदणीचा विधायक कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांनी प्रत्येकी एक रुपया देऊन " भारतीय बौद्ध महासभेचे “ सभासद व्हावयाचे आहे. इतरांबरोबर तुमच्याही खोलीतील वयात आलेल्या स्त्री-पुरुषास सभासद करून घेण्याची सर्व जबाबदारी तुमची आहे. आपल्या चाळीत स्थानिक शाखा स्थापन झाली आहे; तिच्यामाफतच आपण ही जबाबदारी पार पाडावी. " भारतीय बौद्ध महासभेचा “ हा आदेश कृतीत उतरविण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे.
का. वि. सवादकर, वा. क्. कबीर,
भ. स. गायकवाड. चिटणीस, भा. बौ. महासभा.
दिनांक १४ आक्टोबर कसा पार पाडावा
भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व केंद्राधिकाऱ्यांस, शाखा प्रमुखांस तसेच इतर स्थानिक कार्यकर्त्यास जाहीर करण्यात येते की, आपले पूजनीय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूर मुक्कामी रविवार दिनांक १४-१०-५६ रोजी बौद्ध धर्म दीक्षा घेत आहेत. त्यांच्या धर्म स्वीकारासमयी शुभेच्छा प्रकट करण्यासाठी सर्व शाखांनी आपआपल्या वस्तीत सामुदायिक बुद्धवंदना घ्याव्यात, बुद्ध वंदना अति शांत वातावरणात पार पाडण्यात याव्यात. वंदनेत सर्व